सावदा पोलिसांनी १ लाख ६१ हजारांचा अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले जेरबंद.

Spread the love

सावदा प्रतिनिधी | प्रशांत सरवदे
सावदा:-
पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी गुटख्याची वाहतूक करणारे दोन ते तीन व्यक्ती पोलिसांनी पकडले. छुप्या पद्धतीने गुटख्याची अवैध वाहतूक विक्री सुरू असल्याचे वारंवार समोर आले आहे राज्यामध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व इतर पदार्थाच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. असे असले तरी सावदा परिसरातील भागात गुटखाबंदी ही कागदावरच असल्याचे दिसत आहे. मागील अनेक कारवायांमधून हे अधोरेखित झाले आहे. शहरातील छोट्या मोठ्या टपऱ्यांवर सहजरीत्या गुटखा उपलब्ध होतो.मंगळवारी सायंकाळी सावदा परिसरातील चिनावल ते उटखेडा पुलावर येथून गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती पो उपनिरीक्षक अमोल नारायण गर्जे व सहायक पो निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून मोटरसायकला अडविले. मोटरसायकलची तपासणी केली तेव्हा आतमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. याबाबत पोलीस तपास करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो निरीक्षक विशाल पाटील व पो हे काॅ रमजान तडवी यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली. मोटारसायकल वरती १ लाख ६१ हजारांचा प्रतिबंधीत असा विमल पान मसाला आढळून आला. पोलिसांनी गुटख्यासह तीन मोटारसायकल मुद्देमाल जप्त केला. अजय शांताराम कोळी .वय ३७ रा. रोझोदा यश उर्फे योगेश पितांबर चौधरी वय २७ रा. चिनावल अस्लम सलिम तडवी वय २९ रा.लोहारा सर्व ता .रावेर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत व तिन्ही वरती सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी