एरंडोल :- शासन व प्रशासन एकाच रथाचे दोन चाके असून विकासकामांमध्ये दोघांचीही भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन आमदार अमोलदादा पाटील यांनी केले.पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या आढावा बैठकीत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आढावा बैठकीस तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आमदार अमोलदादा पाटील यांनी विविध कामांचा आढावा घेवून मार्गदर्शन केले.शासकीय
कामकाजाबाबतची चालढकल,दिरंगाई सहन केली जाणार नाही असा इशार दिला.पदाधिकारी व अधिका-यांमध्ये समन्वय असल्यास समस्या त्वरित सुटत असल्याचे सांगितले.पदाधिकारी अथवा अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची चुकीची कामे केल्यास त्यांना पाठीशी घालणार नाही असा इशारा दिला.सर्व शासकीय अधिकारी व कर्मचा-यांनी नागरिकांच्या अडचणी त्वरित सोडविण्याच्या
सुचना त्यांनी दिल्या.कामचुकारपणा करणा-या कर्मचा-यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सामुहिकपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.ग्रामीण भागातील नागरिकांची दैनंदिन कामासाठी फिरफिर होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले.राज्यशासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी आमदार अमोलदादा पाटील यांनी नवीन तहसीलदार कार्यालयाचे बांधकाम, तसेच शहरात सुरु असलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामासंबंधी व तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकासकामांची माहिती जाणून घेतली.पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्याची सुचना त्यांनी केली.तालुक्यातील आरोग्यसुविधा, रस्ते,वीजपुरवठा यासह विविध समस्या त्वरित सोडविण्याचे सांगितले.तालुक्यात सुरु असलेली विविध विकासकामे त्वरित
पूर्ण करण्याचे आदेश दिले.शेती,सिंचन,आरोग्य,शिक्षण,दळणवळण यासह अन्य मुलभूत सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे सागितले.सर्व शासकीय अधिकारी व कर्मचा-यांनी विविध कामांची माहिती बैठकीत दिली.प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी आमदार अमोलदादा पाटील यांचे स्वागत केले.बैठकीस प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील,पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, कासोद्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत,मुख्याधिकारी अमोल बागुल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, तालुका संघटक संभाजी पाटील,युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील,माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन,युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील,मयूर महाजन यांचेसह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी,कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.