हरदोई (उत्तर प्रदेश) :- प्रेम आंधळं असतं, असं बोललं जातं. प्रेमात असणाऱ्या व्यक्तीला समोर कोण आहे, याची अजिबात चिंता नसते. या व्यक्तीसाठी समोरचा व्यक्ती सर्वस्व असतो. असाच प्रकार उत्तर प्रदेशच्या हरदोईतून समोर आला आहे.६ मुलांची आई चक्क एका भिकाऱ्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर ही महिला थेट या भिकाऱ्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भिकाऱ्याच्या प्रेमात पडलेली महिला पोटच्या ६ मुलांना सोडून फरार झाली. बायको पळाल्यानंतर नवऱ्याने पोलिसांत तक्रार नोंदवली. तसेच या नवऱ्याने माझ्या बायकोचा शोध ध्या, अशी विनवणी पोलिसांना केली. नवऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील हरपालपूर कोतवाली भागातील ही घटना आहे.
पीडित व्यक्तीने बायको फरार झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली आहे. हरदोईच्या सांडा पोलीस ठाणे हद्दीतील मोहल्ला खिडकिया या भागात राहणारा भिकारी नेहमी या महिलेच्या घरी भीक मागायला यायचा. ही महिला नेहमी या भिकाऱ्यासोबत बोलायची, असे पतीने सांगितले. या प्रकारानंतर पीडित नवरा राजूने पोलिसांत ६ मुले असणारी बायको भिकाऱ्यासोबत फरार झाल्याची तक्रार नोंदवली. ‘बायकोने घरातून बाजारात भाजी आणि कपडे खरेदी करायला जात असल्याचे सांगितलं. त्यानंतर घरात पुन्हा परतलीच नाही. घरात ठेवलेले पैसेही घेऊन गेली. म्हैस आणि माती विकून जमा केलेली रक्कम बायकोने लंपास केले, अशी तक्रार नवऱ्याने नोंदवली. तक्रार नोंदवताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
हरदोईच्या हरलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी राजदेव मिश्रा यांनी सांगितलं की, ‘पीडित नवरा राजूने बायकोला पळवून नेणाऱ्या भिकाऱ्यासोबत तक्रार नोंदवली आहे. पीडित राजूने भिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्याच्या पत्नीने घरातील म्हैस आणि माती विकून मिळालेले पैसेही चोरल्याचे पीडित राजूने सांगितलं. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींचा तपास सुरु केला आहे.