कासोदा येथे नवनिर्वाचित आमदार अमोलदादा पाटील यांच्या भव्य नागरी सत्कार; विविध विकास कामांचे लोकार्पण.

Spread the love

एरंडोल :- कासोदा ता.एरंडोल येथे आमदारपदी निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचीत आमदार अमोलदादा पाटील यांच्या नागरी सत्कार समारंभाचे मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.
या शहराची दैनंदिन वाढती लोकसंख्या पाहता या शहरात वैभवात मोठी भर घालणारी व मुलभुत सुविधेची अनेक विकासकामे मंजुर आहेत. यातील पुर्णत्वास आलेल्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा देखील करण्यात आला.
कासोदा शहराने आजवर प्रत्येक निवडणुकीत मोलाची साथ दिलेली. या शहराचा सर्वांगिण विकासासाठी सदैव कटीबद्द असुन येत्या काळात शहरागत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे ठोस आश्वासित केले.

प्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोजभाऊ पाटील, जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, जिल्हा दुध संघाचे संचालक दगडु चौधरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, युवासेना विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्ञानेश्वर कंखरे, एरंडोल तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, पारोळा तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, पं.स.मा.सभापती अनिलभाऊ महाजन, गबाजीआण्णा पाटील, युवासेना मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, तालुकाप्रमुख कमलेश पाटील, कासोदा मा.सरपंच महेश पांडे, कासोदा सरपंंच बंटी चौधरी, वनकोठे मा.सरपंंच उमेश पाटील, अंतुर्ली सरपंंच गौरव पाटील, आनंदनगर येथील देशमुख राठोड, फरकांडे मा.सरपंच शरद पाठक, कासोदा येथील ॲड.वासुदेव वारे, गोकुळ शिंपी, अमोल पवार, सोनु शेलार, भुषण शेलार यांचेसह कासोदा व पंचक्रोशितील ग्रामपंचायत, विकासो व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे, शिवसेना, युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, आदी मान्यवर व कासोदा शहरवासिय उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी