जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान वाचन

Spread the love

जामनेर(प्रतिनिधी):-येथील न्यायालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले.मुख्य न्यायाधीश दि.न.चामले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश भुषण काळे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश प्रशांत सूर्यवंशी, वकील संघाचे अध्यक्ष कमलाकर बारी,सचिव दिगंबर गोतमारे सहा.सरकारी अभियोक्ता ॲड कृतिका भट,ॲड रुपाली चव्हाण सह सर्व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.अशोक डोल्हारे, अरुण नाना, व्हि एस पाटील,ॲड शिवाजी सोनार, ॲड प्रकाश पाटील,आर.बी.पाटील,बापुजी बाविस्कर,ॲड बी.एम.चौधरी,ॲड महेंद्र पाटील,ॲड.अनिता पाटील,ॲड सोनाली सुरवाडे,ॲड शिल्पा सावळे,ॲड. रुपाली पाटील सह सर्व वकील बांधव,न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.ध्वजारोहणानंतर संविधानाचे सामुहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर न्या.चामले यांनी आपल्या भाषणात सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.न्यायालयाचे आवारात काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.त्याचे संपूर्ण श्रेय न्या.चामले यांनी न्यायालयायीन कर्मचारी जावळे, बेलिफ परसोडे यांना दिले.अत्यंत उत्साहात भारताचा प्रजासत्ताक दिन येथील न्यायालयात साजरा करण्यात आला.

मुख्य संपादक संजय चौधरी