दुर्देवी घटना! जामनेर नगर परिषदेच्या तरण तलावात १५ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू.

Spread the love

जामनेर (प्रतिनिधी):- जामनेर नगर परिषदेच्या सध्या बंद अवस्थेत असलेल्या तरण तलावत पंधरा वर्षीय बालकाचा पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की संकेत निवृती पाटील(वय १५वर्ष )रा.(घोसला ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजी नगर) हल्ली रा. हिवरखेडा रोड जामनेर हा येथील शाळेमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता. तो आपल्या लहान भाऊ आणि आजी सोबत जामनेर येथे वास्तव्यास होता.संकेत पाटील हा आज शाळा बुडवून पोहण्यासाठी सोनबर्डी मागील नगर परिषदेच्या सध्या बंद अवस्थेत असलेल्या तरण तलावत पोहण्यासाठी गेला होता. तरण तलावाची डागडुजी करण्यासाठी त्यात नुकतच पाणी भरण्यात आलं होतं. संकेत आपल्या काही मित्रांसोबत येथे पोहायला आला होता. यावेळी घटना स्थळावर सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी हजर नसल्याने संकेत हा आपल्या मित्रांसोबत तरण तलावातमध्ये पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पोहता येत नसल्याने पोहण्याचा मोह संकेतच्या जीवावर बेतला आणि तरण तलावात बुडुन संकेतचा मृत्यु झाला.तरण तलावाची डागडूजी करण्यात येत असल्याने तिथे पाणी भरण्यात आल्याची माहिती जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी बागुल यांनी दिली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी