पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..

Spread the love

पारोळा :- शहरालगत जाणाऱ्या वळण रस्त्यावरून एल एएन पी लिक्विड गॅस चा टँकर उलटला असून त्यातून गॅस गळती होत होती. परंतु प्रशासनाच्या सतर्कतेने खूप मोठा होणारा अनर्थ टाळला.
ही घटना मंगळवारची रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.
अहमदाबाद गुजरात येथून जळगाव कडे जाणारा लिक्विड नॅचरल गॅस भरलेला टँकर चालक सुभाषचंद्र सरोज वय ३३, राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश हा टँकर घेऊन जळगाव कडे जात असताना टॅंकर डिव्हायडरला आढळला हायवे ला रस्त्यात आडवा झाला. त्यामुळे गॅस गळती सुरू झाली होती. घटनेची माहिती मिळतात तात्काळ पारोळा पोलीस व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गाव घेतली प्रथम चालक सरोज पारोळा कुटीर रुग्णालयास दाखल केले.
18 टन यास असलेल्या या टॅबलेट पेपर मधून गॅस गळती होत असल्याने त्याचप्रमाणे टॅंकर चे तापमान वाढत असल्याने धोक्याची शंका निर्माण झाली म्हणून या परिसरातील पाचशे मीटरच्या अंतरातील असलेली वस्ती खाली करावी असे प्रशासनाने निर्णय घेतला. त्यानुसार परिसरातील नागरिकांचे स्थलांतरदेखील करण्यात आले.
घटनेची तीव्रता पाहता घटनास्थळी पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार व त्यांचे सहकारी रात्री एक वाजेपासून तळ ठोकून होते. त्याचप्रमाणे तहसीलदार अनिल पाटील , शहर तलाठी निशिकांत माने यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम केले. या कामी अमळनेर पारोळा एरंडोल येथील अग्निशामन दलाचे बंब उपस्थित झाले होते तर जिल्ह्यावरून आपत्ती व्यवस्थापनाचे स्क्वाड हजर झाले होते घटनास्थळी, आमदार अमोल पाटील, उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड, यांनी तातडीची भेट दिली.
चौकट-

सुदैवाने अनर्थ टळला….

अपघातानंतर टँकरच्या आतील भागातील प्रेशर 65- अंशपर्यंत गेल्यावर काही होऊ शकत होते परंतु पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी घेतलेल्या निर्णयानुसार काही गॅस जमिनीवर सोडवण्यात आला त्यामुळे होणारा अनर्थ टळला. परंतु परिसरात सायंकाळपर्यंत नागरिकांमध्ये घबराट निर्माण झालेली होती.

हायवे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर –

सदर वळण रस्ता हा पहिल्या दिवसापासून त्रासदायक ठरला आहे धरणगाव चौफुली ही घातक चौफुली म्हणूनच बदनाम झालेली आहे त्यामुळे येथे उड्डाणपूल व्हावा अशी मागणी जोर धरत आहे. परंतु महामार्गाच्या अधिकाऱ्यांचे या विषयाकडे दुर्लक्ष होत असतानाचे दिसून येत आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी