जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त

Spread the love

जळगाव :- चोरीची मोटर सायकल चालवणाऱ्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून सात लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या 15 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहे. यात मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आले आहे.मोटरसायकलीच्या चोरीच्या वाढत्या घटना बघून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. यातच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी प्रदीप चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली की एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती चोरीच्या मोटरसायकल घेऊन फिरत आहे. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली असता पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी विकास सातदिवे, रतन गीते, राहुल होते, योगेश बारी, योगेश घुगे यांनी संशयित आरोपीला मोटरसायकलसह ताब्यात घेतले. संशयित आरोपी व्यक्ती नंदलाल भालेराव वय 28 राहणार वाघ नगर याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता सदरची मोटरसायकल ही बहिणाबाई उत्सव मधून चोरल्याचे त्याने सांगितले. आरोपीला पोलीसकस्टडी मध्ये विचारपूस केली असता त्याने त्याच्याजवळून जळगाव शहरातील जिल्हा पेठ रामानंद एमआयडीसी मोडी धुळे परिसरातून चोरलेल्या 15 मोटरसायकल साडेसात लाख रुपये किमतीच्या काढून दिल्या. याप्रकरणी एमआयडीसीचे दोन जिल्हा परिषदचे तीन रामानंद चे तीन मोहाडी पोलीस स्टेशनचा एक असे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी