काॅग्रेस व शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश

Spread the love

भडगाव (प्रतिनिधी) :- आज जळगाव येथे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण व जिल्ह्याचे नेते ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व अभियान अंतर्गत जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत भडगाव नगर परिषदेचे शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक सचिन चोरडिया, युवक काँग्रेसचे पाचोरा विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, काँग्रेस आदिवासी सेलचे भडगाव तालुका अध्यक्ष नाना मालचे, काँग्रेस आदिवासी सेल जिल्हा उपाध्यक्ष मिथुन गायकवाड, वडजी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक बाबाजी पाटील, संजय परदेशी, मंगलसिंग बच्छाव, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस अतुल पाटील, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस आर एस पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश महामंत्री आ. विक्रांत पाटील, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, ना. जयकुमार रावल, खा. स्मिताताई वाघ, आ. राजुमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. डॉ विजयकुमार गावित, आ. अमोल जावळे, आ. अनुप अग्रवाल, आ. राजेश पाडवी, आ. राम भदाणे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील महाराज जळकेकर, माजी मंत्री डॉ सुभाष भामरे, एम के आण्णा पाटील, सदस्य नोंदणी अभियान प्रदेश सहसंयोजक डॉ राधेश्याम चौधरी, किशोर काळकर, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांची उपस्थिती होती.

मुख्य संपादक संजय चौधरी