मुख्याधिकारी नगरपरिषद एरंडोल यांना कर्तव्याची करून दिली आठवण; “आश्वासन नको समस्या सोडवा ‘ संघर्ष समिती ची मागणी……

Spread the love

एरंडोल :- दिनांक 20 .02.2025
संघर्ष समिती एरंडोलचे अध्यक्ष रवींद्र लाळगे व उपाध्यक्ष नामदेवराव पाटीलआणि संघर्ष समितीचे संचालक मंडळ सदस्य यांनी आज दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजीनगरपरिषद एरंडोलचेे मुख्याधिकारी माननीय बागुल साहेब यांचे त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन एरंडोल शहराला भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबतचे निवेदन देऊन चर्चा केली याप्रसंगी इतर अधिकारी उपस्थित होते.नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व इतर अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्याचे जाणीव करून देण्याचे काम संघर्ष समितीने आज रोजी केले.एरंडोल शहरामध्ये विविध समस्या नेहमी भेडसावत असतात, मात्र नगरपरिषद याकडे फक्त बघायचे भूमिका घेते, विविध समस्या वारंवार मांडणे चर्चा करणे व निवेदन देणे यावर काही उपाययोजना होईल किंवा नाही अशा प्रकारचा प्रश्न याप्रसंगी समितीने उपस्थित केला.एकच प्रश्न वारंवार मांडण्याची गरज निर्माण होणे याचा अर्थ नगरपरिषद या बाबींकडे गांभीर्याने बघत नाही असे दिसून येते.यासाठी आपले कर्तव्याचे जाणीव करून देण्याचे काम संघर्ष समितीने आज रोजी केले.यावेळी महत्त्वाच्या समस्या समितीने मुख्याधिकारी यांचे समोर सादर केल्या.
यात प्रामुख्याने

नवीन वसाहती एरंडोल शहरातीलव इतरत्रही भूमिगत गटारीचे काम लवकरच सुरू करावे जेणेकरून पावसाळ्यामध्ये पुन्हा रस्त्यांचा प्रश्न निर्माण होणार नाही .रस्त्यावर पाणी साचणार नाही व नागरिकांचे हाल होणार नाहीत वेळेच्या वेळी दखल घेणे व कार्यवाही करणे आवश्यक आहे अशा प्रकारचे निवेदन केले याप्रसंगी मुख्याधिकारी यांनी कामास गती देण्याबाबतचे आश्वासन दिले .
अमृत जलवाहिनीचे काम संत गतीने सुरू आहे एरंडोल शहरामध्ये विविध ठिकाणी फक्त खोदकाम करून ठेवलेले आहे तर काही ठिकाणी फक्त पाईप टाकलेले आहेत तर काही ठिकाणी नळ्या काढून बाहेर सोडलेल्या आहेत संबंधित ठेकेदार या कामाकडे दुर्लक्ष करत असून कामास गती देण्याचेआश्वासन याप्रसंगी मिळाले परंतु समितीने आग्रह धरला की हे कार्य पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा अन्यथा लोकांचा रोष निर्माण होईल व नागरिकांना रस्त्यावर येण्याची गरज निर्माण होऊ शकते .त्यामुळे हे काम जलद गतीने पूर्ण करावे अशा प्रकारची जोरदार मागणी संघर्ष समितीने प्रसंगी केली शासन व प्रशासन यांनी याबाबतीत जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे गरज आहे असे प्रसंगी नमूद केले

त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत नगरपरिषद पाहिजे तेवढे लक्ष देत नाही वैकुंठ धाम परिसरामध्ये नेहमी स्वच्छता व्हावी व कायमस्वरूपी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मार्फत स्वच्छतेचे काम देण्यात यावेअसे वारंवार मागणी अगोदर केलेली आहे परंतु नगरपरिषद त्याकडे कानाडोळा करते ही बाब गंभीर स्वरूपाची आहे , या ठिकाणी वारंवार प्रासंगिक स्वरूपात लोक जातात त्यांना बसण्यासाठी सुद्धा जागा आहे परंतु स्वच्छता नाही. नगरपरिषदेकडे जवळपास स्वच्छता व साफसफाई यासाठीजवळपास 43 कर्मचारी कार्यरत आहेतअसे असून देखील अशा प्रकारची अस्वच्छता असणे हे नगर परिषदेला न शोभणारी बाब आहे यापुढे अशा प्रकारचे मागणी करण्याची गरज निर्माण होणार नाही असे काम नगरपरिषदे करावे अशा प्रकारची भूमिका संघर्ष समितीने घेतली .
त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत म्हसावद रोडवरील शेतकरी संघसमोर व इतरत्र ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये अतिशय घाण दिसून येते बरेच दिवसापासून स्वच्छता केलेली आढळून येत नाही याकडे नगरपालिकेचे लक्ष जाऊ नये हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो याकडे नगरपरिषदने लक्ष घालावे व स्वच्छता करावी फक्त “स्वच्छ एरंडोल सुंदर एरंडोल’ असे म्हणण्यात फारसा अर्थ उरत नाही

नवीन वसाहतीमध्ये विविध कॉलनीमध्ये स्वच्छतागृहांची आवश्यकता आहे नगरपालिकेने स्वच्छतागृह प्रस्तावित करावी व काही ओपन प्लेस सुशोभिकरण करण्याची आवश्यकता असून त्यात सुद्धा प्रस्ताव मंजूर करून घ्यावे तो कामाला लवकर प्रारंभ करावा त्याचप्रमाणे गट नंबर 10 60 मधील ओपन स्पेस साठी भिंतीचे काम चालू आहे परंतु सदर कामाच्या बाबतीत होणारे भिंतीचे बांधकाम हे अयोग्य पद्धतीने होत आहे अनावश्यक उंची वाढवण्यात येत आहे.सदर कामात त्वरित लक्ष देऊन इस्टिमेट नुसार व इतर ओपन स्पेस प्रमाणे भिंतीची उंची घेण्यात यावी अन्यथा सदर परिसरातील नागरिकसंघर्ष समितीच्या माध्यमातूनआंदोलन करण्यास मागेपुढे बघणार नाहीत असे संघर्ष समिती ने स्पष्ट केले.
अंजनी नदीमधील घाण साफसफाई करून नदीच्या दोघ बाजूंना सुशोभीकरण करण्यात यावे जेणेकरून शहराच्या सौंदर्यामध्ये वाढ होईल व त्या जागेचा योग्य प्रमाणे उपयोग होऊ शकेल अशा प्रकारची मागणी समितीने केली धुळे, अमळनेर या ठिकाणी नदी परिसराचा योग्य प्रकारे विकास केलेला आहे त्या दिशेने आपले अंजणी नदी सुद्धा सुशोभित करावी अशी मागणी केली
विद्यानगर व इतरत्र ठिकाणी काही ठिकाणी ढाबे तुटलेले आहेत हे तुटलेले ढाबे अपघाता आमंत्रण देणारे आहेत तरी याबाबत त्वरीत दुरुस्तीचे काम केले जावे एरंडोल शहरातील नवीन वसाहतींमध्ये गेल्या काही दिवसात रस्त्यांचे काम करण्यात आले परंतु सदर रस्त्यांच्या कामांमध्ये एक सूत्रीपणा दिसून येत नाही काही ठिकाणी मोठमोठे दगड टाकले मुरूम कमी प्रमाणात टाकला, लेव्हल देण्यात आली नाही तर काही ठिकाणी छोटे छोटे तुकडे रस्त्याचे अपूर्ण सोडलेले आहेत नगरपरिषदेने खात्री करून हे काम चांगल्या प्रकारे व मुदतीत पूर्ण करावे

नगर परिषदेस लाभलेले मुख्याधिकारी हे अनुभवी आहेत सु स्वभावी आहेत कार्य तत्पर आहे त परंतु त्यांनी मनावर घेतलं तर हे काम त्वरित होऊ शकते व ते कामांना गती देवू शकतात. आठवडे बाजाराचे प्रश्न पेंडिंग आहेत पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे व संघर्ष समितीने वेळोवेळी मागणी केल्यामुळे मेन रस्त्यावरील बाजार हाआंबेडकर पुतळा परिसरात हलवण्यात आला हे तात्पुरत्या स्वरूपात योग्य व चांगलं काम जरी असले तरी आठवडे बाजार मुळ ठिकाणी भरण्या भरवण्यात यावा अशा प्रकारचे मागणी समितीने केले
सदर मागण्यांबाबत नगरपरिषदेने समाधानकारक खुलासा द्यावाअशा प्रकारची संचालक मंडळाने मागणी केली.
याप्रसंगी संघर्ष समितीचेअध्यक्ष रवींद्र लाळगे ,उपाध्यक्ष नामदेवराव पाटील सचिव दिनेश चव्हाण संचालक नानाभाऊ मिस्त्री व इतर संचालक उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी