पती पत्नीमध्ये लग्नात डान्स करण्यावरून झाला वाद; आनंदावर पडलं विरजण, पतीने पत्नीची गळा घोटून केली हत्या,पती मंडपातूनच फरार.

Spread the love

ढोलपूर (राजस्थान) :- लग्न घर असल्यामुळे सगळं घर आनंदात होतं, पण अवघ्या काही वेळात या आनंदावर विरजण पडलं, कारण लग्नातल्या डान्सवरून झालेला वाद थेट मर्डरपर्यंत पोहोचला. सोमवारी रात्री डान्सनंतर झालेल्या वादात पतीने पत्नीची गळा घोटून हत्या केली, त्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला.सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. राजस्थानच्या ढोलपूरमध्ये ही घटना दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार करौली जिल्ह्यातल्या महावीरचं लग्न तीन वर्षांपूर्वी ढोलपूरच्या करका खेरलीची निवासी बबीतासोबत झालं होतं. सोमवारी दोघं एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते, तेव्हा रात्री डान्स करण्यावरून दोघांमध्ये वाद झाले. मध्यरात्री जेव्हा सगळे नातेवाईक झोपायला गेले, तेव्हा महावीरने बबिताच्या डोक्यावर वार केले आणि गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर महावीर तिथून फरार झाला.

मंगळवारी सकाळी जेव्हा नातेवाईक उठले तेव्हा त्यांना बबिताचा मृतदेह खोलीमध्ये पडलेला दिसला, पण तिकडे महावीर नव्हता. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना बोलावलं. घटनास्थळी पोलीस पोहोचताच त्यांनी बबिताचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.बबिताचे वडील वासुदेव यांनी जावई महावीरवर हत्या आणि हुंड्यासाठी मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. एक महिन्याआधीही बबिता आणि महावीर यांच्यात वाद झाले होते. यानंतर महावीर फरिदाबादमध्ये कामासाठी गेला. बबिताच्या हत्येनंतर पोलीस तिचा पती महावीरचा तपास करत आहेत. तसंच लग्नात उपस्थित असलेल्या नातेवाईकांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी