
जामनेर(प्रतिनिधी):- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती देशात नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच निमित्ताने जामनेर भिमनगर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी समिती गठीत केली गेली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२५ च्या अध्यक्ष सचिन अनिल सुरवाडे, उपाध्यक्ष प्रशांत भिवसन सुरवाडे, खजिनदार राहुल चंद्रकांत इंगळे,सचिव महेंद्र भिमराव रणीत,सहसचिव आदर्श इंगळे, कार्याध्यक्ष सौरव अवचारे,हिशेब तपासणीस शुभम जंजाळे, पवन जंजाळे, सल्लागार गोपाल भीमडे,किशोर तायडे, रमेश सुरवाडे,महेंद्र मोरे, मुकुंद सुरवाडे,विनोद सुरवाडे,सुभाष सुरवाडे,अक्षय निराले,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वसंत सुरवाडे होते.यावेळी सुरेश मोरे,गुड्डू लोखंडे,सुमेध खरे,भूषण सुरवाडे,रोशन सुरवाडे, प्रथमेश सुरवाडे,अरविंद सुरवाडे,खुशाल पानपाटील,नरेंद्र भीमडे, दीपक सुरवाडे, मनोज मोरे,जीवन जंजाळे,मोहित सुरवाडे,अरुण सुरवाडे,सुमित सुरवाडे,श्रवण सुरवाडे, कौशल सुरवाडे.आदी भीमसैनिक बैठकीला उपस्तिथ होते