
जामनेर प्रतिनिधी:- धरणगांव बार असोसिएशनचे सदस्य ॲड.राहुल शांतीलाल पारेख यांच्या वर २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्या व अश्लील शिवीगाळ केली तसेच कार्यालयाची नासधूस केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून निषेध व्यक्त करत आज मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी जामनेर वकील संघाचे वतीने न्यायालयात कामकाजात सहभागी न होता या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत हल्ला करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांच्या वर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी जामनेर बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.