एरंडोल :- शहरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीहोती. महाशिवरात्रीनिमित्त शहरात ठिकठीकाणी मोफत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.आमदार अमोल पाटील यांनी पत्नी मृणाल पाटील यांचेसोबत मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी देवून महादेवाची विधिवत पूजा केली तसेच फराळाचे भाविकांना वाटप केले.सायंकाळी शहरातून हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
महादेव मंदिर ट्रस्ट-
महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिर परिसरात तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.महाशिवरात्रीनिमित्त पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचेहस्ते अभिषेक करण्यात आला.याशिवाय कीर्तन व कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.कुस्तीमध्ये विजेत्या पहेलवानांना रोख बक्षिस देण्यात आले.पंच म्हणून पांडुरंग धोबी,संजय महाजन,सतीश परदेशी,दिनेश पाटील यांनी काम पाहिले.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष रमेश परदेशी,उपाध्यक्ष advt.नितीन महाजन,सचिव वसंत चौधरी, सल्लागार समितीचे अध्यक्ष विजय महाजन यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.
जय भोले ग्रुप–
अंजनी नदीच्या काठावर असलेल्या पुरातन महादेव मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.याठिकाणी जयभोले ग्रुपतर्फे सात क्विंटल ५१ किलो साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अँड.किशोर काळकर,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,जगदीश ठाकूर यांचेसह प्रमुख पदाधिका-यांनी हजारो भाविकांना फराळाचे वाटप केले.जयभोले ग्रुपतर्फे सुमारे २१ वर्षांपासून भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येत आहे.यावेळी ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश शिरोडे,सचिव संजय चौधरी,सदस्य कैलास पाटील,संजय साळी,संजय शिरोडे,समाधान चौधरी,संतोष महाजन, आबा वंजारी,राजू वाणी,विजय देशमुख,आबा वाणी,कैलास महाजन, जयवंत वाघ,संजय पाटील,सुधीर चौधरी,वासुदेव वंजारी,निलेश कुंभार,मनोज मराठे,भगवान पाटील यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
जय बाबाजी भक्त
परिवाराच्यावतीने नवीन बसस्थानक परिसरात महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भक्त परिवाराच्यावतीने हजारो भाविकांना उसाच्या रसाचे वाटप करण्यात आले.शहरात सर्व महादेव मंदिरात भाविकांसाठी फराळ वाटप करण्यात आले. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.