शिरूर : – स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरण ताजं असताना आता शिरूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आलीय. दरोड्यासह सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आलाय. रस्त्याकडेला गप्पा मारणाऱ्या तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.कारेगाव इथं शनिवारी रात्री १९ वर्षीय पीडित तरुणी आणि मामेभाऊ रस्त्याकडेला गप्पा मारत उभा होते. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवला. यानंतर जीवे मारण्याची धमकी देत दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा दोन्ही आरोपींनी पीडित तरुणीला आधी मामेभावासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं.
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पीडित तरुणीला मामेभावाशी संबंध ठेवायला लावून व्हिडीओ शूट केला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी पीडित तरुणीशी बळजबरीने शरीरसंबंध ठेवले. तरुणीवर बलात्कारानंतर तिच्या अंगावरील दागिनेही लुटल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
पीडित तरुणी आणि मामेभावाने घरी आल्यानंतर हा प्रकार सांगितला. यानंतर पीडित तरुणीच्या बहिणीच्या नातेवाईकांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर गुन्हा दाखल करत अमोल पोटे आणि किशोर काळे यांना अटक केली. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.