52 वर्षीय सासरा व त्याच्या मित्राने नवविवाहीत सुनेस १५ दिवस घरात डांबून ठेवत केला लैंगिक अत्याचार आरोपी सासरा व त्याच्या मित्र फरार.

Spread the love

ठाणे :- आपल्या पतीसोबत विभक्त राहणाऱ्या नवविवाहीत सुनेवर सासऱ्याने आणि त्याच्या मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पीडितेने आणि तिच्या माहेरकडील कुटुंबीयांसोबत पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दिली.ठाणे पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. नारपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सासरा आणि त्याच्या मित्रावर भारतीय दंड संहितेच्या कलम 64,127 (4), 351 (3), 74 आणि 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत मात्र, लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पोलीस म्हणाले.

घरात डांबून अत्याचार

पीडितेने पोलिसांना माहिती देताना सांगितले की, पीडिता आणि तिचा पती आपल्या कुटुंबापासून वेगळे राहत होते. सासरच्यांपासून पतीसोबत वेगळे राहणाऱ्या सुनेबद्दल 52 वर्षीय सासऱ्याच्या मनात आकस होता. दरम्यान, एके दिवशी सासरा सुनेकडे अचानक आला आणि त्याने तुला तुझ्या आई-वडीलांकडे सोडतो, असे सांगत जबरस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आई-वडीलांकडे घेऊन जाण्याचे आमीश दाखवणाऱ्या सासऱ्याने सदर सुनेस भलत्याच मार्गाने आपल्या स्वत:च्या घरी आणले आणि जवळपास 15 दिवस डांबून ठेवले. सासरा इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या मित्रास बोलावून घेतले आणि दोघांनी आपला लैंगिक छळ केला असेही पीडितेने म्हटले आहे.

सासरा झोपताच सुनेचा चकवा

दरम्यान, जवळपास 15 दिवसांपासून सुरु असलेला छळ सुरुच होता. मात्र, एकदा सासरा झोपी गेल्याचे पाहून आपण कशीबशी सुटका करुन घेत, हळूच पळ काढला आणि माहेर गाठले. त्यानंतर कुटुंबीयांसोबत पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिल्याचेही पीडिता सांगते. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, गुन्हाही दाखल केला आहे. अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अन्याय अत्याचाराविरोधा माहिती आणि मदत

महिला आणि लहान मुले यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार यांची तक्रार करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी सेवा उपलब्ध असतात. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. स्वत:बद्दल किंवा पीडिताबद्दल माहिती देणे आणि मदत मिळविणे यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवा:

महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:

चाइल्डलाइन इंडिया: 1098; हरवलेली मुले आणि महिला: 1094; महिला हेल्पलाइन: 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग: 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन: 7827170170; महिला आणि ज्येष्ठ नागरिक पोलीस हेल्पलाइन: 1091/1291.

मुख्य संपादक संजय चौधरी