Video: लखनौ (उत्तर प्रदेश): साखरपुडा सुरू असताना एका युवतीने आपले वधूसोबत 4 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला. अलीगडमध्ये घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या गदारोळानंतर मुलाच्या बाजूने लग्न मोडण्यात आले आहे.सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बुलंदशहरच्या पहासू पोलीस स्टेशन भागातील एका एमए पास तरुणीचे नाते अलीगढच्या क्वार्सी भागात राहणाऱ्या युवकासोबत निश्चित झाले होते. काल रात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधी पार्क परिसरातील रुबी हॉटेलमध्ये मुलीच्या साखरपुडा सोहळ्याचा कार्यक्रम होता. वधू-वर दोघेही स्टेजवर उभे होते. तेवढ्यात एक मुलगी तिथे पोहोचली आणि नवरीला मिठी मारून हाताशी धरून घेऊन जाऊ लागली. यावरून दोघींमध्ये भांडण झाले. यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
यावेळी मुलीने सर्वांना सांगितले की, नवरी आणि माझे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. शिवाय, काही पुरावे दाखवले. मात्र, नवरी हे मानण्यास तयार नसल्याने नातेवाईकांसह खोलीत गेली. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या मुलीला वेगळे बसवले. दोघीही कोचिंग सेंटरमध्ये एकत्र शिकत होत्या. बीना बीए पास आहे, तर वधू एमए पास आहे. एका कोचिंग सेंटरमध्ये त्यांची मैत्री झाली. 2021 मध्ये एका लग्नादरम्यान दोघींमधील जवळीक वाढली होती. बीना या मुलीने प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘आम्ही चार वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहोत. 2021 माझ्या बहिणीचे लग्न झाले, तेव्हा तिने सुरुवात केली. ती मला तिच्या घरी बोलवायची. समाजात मान्य नसल्याचे तिला सांगितले. पण तिला ते पटले नाही. तिच्या आईशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने जीवे मारण्याची धमकी देऊन माझ्याशी बोलण्यास नकार दिला. दरम्यान, संबंधीत प्रकरणाची परिसरात चर्चा रंगली आहे.