बोदवड :- धान्याने भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रेल्वे गेट तोडून मुंबई – अमरावती एक्सप्रेसच्या इंजिनवर जाऊन धडकला. यात कुठलिही जिवित हानी झाली नाही.मात्र, 5 तास रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजता बोदवड रेल्वेस्थानकापासून ५०० मीटर अंतरावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक टी एन 52- एफ -7472 आज दि. 14 रोजी सकाळी 4.45 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर कडून बोदवड कडे गहू घेऊन जात होता. रेल्वे ओव्हर ब्रिज वरून न जाता GPS लोकेशन चुकल्यामुळे ट्रक चालकाने बंद असलेल्या क्रॉसिंगच्या रस्त्याने प्रवेश केल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय अंधार आल्याने ट्रक चालकाला अंदाज आला नाही. रेल्वे क्रॉसिंग तोडून रेल्वे ट्रक थेट रेल्वे लाईन वर अडकल्याने व ट्रक मागेपुढे काढता येत नसल्याने ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची प्रशासनाची माहिती आहे. रेल्वे ट्रॅकवर ट्रक अडकल्याने त्याचवेळी अमरावतीकडे जाणारी अमरावती एक्सप्रेस वेगात असल्याने ट्रकला धडक देऊन 200 ते 300 मीटर पर्यंत ओढत नेले. यामुळे रेल्वे इंजिनचे नुकसान तर झालेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी या अपघाताबाबत माहिती दिली.
अपघात एवढा भयानक होता की रेल्वे इंजिन खाली अर्धा ट्रक अडकलेला होता. त्यामुळे त्याला काढण्यासाठी क्रेन जेसीबी घटनास्थळी बोलवण्यात आले व ट्रक काढण्याचे प्रयत्न सुरू झाले तसेच परिसरातील विद्युत पुरवठा ही बंद करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेस नवजीवन एक्सप्रेस दुरंतो एक्सप्रेस यांचे मार्ग बदलण्यात आले तर भुसावळ बडनेरा व बडनेरा नारखेडा कडे जाणारी पॅसेंजर रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आलेली आहे तर काही गाड्या वरणगाव भुसावळ कडे थांबवण्याची माहिती मिळत आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी बोदवड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अनिल भोळे यांच्याशी संपर्क साधला असतात त्यांनी सागितले की, अमरावती कडे जाणारी अमरावती एक्सप्रेसला रेल्वे ट्रॅकवर ट्रक येऊन धडकला आहे, या घटनेत कुणालाही दुखापत किंवा मृत्यू झालेला नाही. ट्रक ASHOK LEYLAND मुक्ताईनगर कडून बोदवड येणाऱ्या जुना रस्ता खालून होता, ओव्हर ब्रिज झाल्यामुळे हा रस्ता बँरीकेड लावून बंद केलेला असतो, ट्रक ड्राइवरला हा रस्ता माहित असावा, पूल सुरु होऊन दीड एक वर्ष होत आलंय दीड वर्षांपूर्वी या रोडने हा ट्रक ड्राइवर गेला असेल म्हणून तो पुलावर न जाता खालच्या रस्त्याने जात असावा. गॅस कटर ने ट्रक कट करायचे काम सुरू झाले आहे,Jcb च्या साहाय्याने ट्रक काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत
घटना 4:45 च्या आसपास ची आहे.
तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांचे संपर्क त्यांनी सांगितले की इंजिनचे ही नुकसान झालेले आहे अपघात झालेले इंजिन दुरुस्तीसाठी पियोजकडे पाठवण्यात येणार आहे तर अमरावती एक्सप्रेस ला नवीन इंजिन लावण्यात येऊन गाडी मार्गस्थ करण्यात येईल 9:30 ते 10 वाजेपर्यंत हा मार्ग सुरळीत झालेला असेल अधिकारी आपत्कालीन व्यवस्था घटनास्थळी आपले काम करीत आहे.
झोपलेले प्रवासी बर्थवरून खाली
एक्प्रेसची गती कमी असल्याने चालकाने ब्रेक लावून रेल्वे थांबवली. तर ट्रक इंजिनवर धडकताच ट्रक चालक उडी घेऊन पसार झाला. एक्स्प्रेस चालकाने तातडीने ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. परंतु, एक्स्प्रेसमध्ये झोपलेले प्रवासी बर्थवरून खाली पडले.
जखमींवर रूग्णालयात उपचार
या अपघातात कोणताही जिवितहानी झाली आहे. जखमी झालेल्यांवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.