छत्रपती संभाजीनगर :- पैशांसाठी एका आजी आजोबांनी आपल्या नातीला विकल्याचा प्रकार घडला आहे. ही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरमधील शेवगावमध्ये घडली आहे. २ लाख रूपयांसाठी आजी आजोबांनी १४ वर्षीय मुलीचं लग्न लावून दिलं.२ महिने पतीच्या लैंगिक त्रासाला कंटाळून तिनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर हे प्रकरण समोर आलं.
छत्रपती संभाजीनगरमधील शेवगावमध्ये अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. पैशांसाठी आजी आजोबांनी १४ वर्षीय मुलीचं लग्न लावून दिलं. दहा वर्षांची असतानाच वडील वारले होते. आई विचार न करता लेकीला सोडून गेली. ती मुलगी आजी-आजोबा आणि काकांकडे राहत होती. मुलगी नववीत शिकत असल्याची माहिती आहे.नंतर आजी – आजोबा आणि काकांना ती नकोशी झाली होती. आजी-आजोबांनी एका कुटुंबाकडून दोन लाख रुपये घेऊन तिचे लग्न लावून दिले होती. नतंर ती सासरी नांदायला गेली. पतीच्या लैंगिक त्रासात तिने २ महिने काढले. मात्र, हा त्रास वाढत गेल्यामुळे तिनं थेट पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना आपबिती सांगितली.
ही घटना मंगळवारी उघड झाली. मुलीनं पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आजी-आजोबांनी तिच्या सासरच्यांकडून तिच्यादेखत दोन लाख रुपये घेतले होते. १ जानेवारीला गावातील एका २५ वर्षीय युवकासोबत लग्न लावून देण्यात आले होते. त्रास असह्य झाल्यामुळं मुलीनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.