Viral Video: इंस्टाग्रामवर दोन विद्यार्थ्यांमध्ये झाला वाद, विद्यार्थ्याच्या घरावर केला हल्ला, आईला कारच्या बोनेटवर बसवलं अन्…..पहा धक्कादायक व्हिडिओ.

Spread the love

Viral Video :- आजकाल व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर झालेले वाद इतक्या टोकाला पोहोचतात की अनेकदा पोलीस स्टेशन गाठण्याची वेळ येते. हरियाणाच्या सोनीपतमधील असंच एक प्रकरण समोर आलं आहे. इंस्टाग्रामवर झालेल्या वादानंतर विद्यार्थ्यांच्या एका गटाने दुसऱ्या गटातील विद्यार्थ्याच्या आई आणि भावावर हल्ला केला.सोनीपतच्या सेक्टर 15 येथील डीएवी शाळेसमोर ही घटना घडली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये एका मुद्द्यावरुन इंस्टाग्रामवर शाब्दिक वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की विद्यार्थ्यांच्या एका गटाने दुसऱ्या विद्यार्थ्याच्या घरावर हल्ला केला. आधी त्यांनी विद्यार्थ्याच्या भावाला मारहाण केली. यानंतर त्यांनी त्याच्या आईला कारच्या बोनेटवर बसवून कित्येक मीटरपर्यंत फरफटत नेलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने महिलेला गंभीर दुखापत झालेली नाही. पण त्यांच्या मुलाला अनेक जखमा झाल्या आहेत.

पीडित महिला आणि तिच्या मुलाने सांगितलं की, इंस्टाग्राम ग्रुपवर झालेल्या वादानंतर काही तरुण आले आणि त्यांच्यावर निर्दयीपणे हल्ला केला. पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेतली आहे. आम्ही व्हिडीओच्या आधारे संपूर्ण प्रकऱणाची चौकशी करत आहोत असं त्यांनी सांगितलं आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी