भुसावळ तालुक्यात दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या,संशयित आरोपी पती फरार.

Spread the love

वरणगाव :- भुसावळ तालुक्यातील  विल्हाळा शिवारातील आश्रामाता रोडवरील विट्ट भट्टी मजुराने त्याच्या पत्नीची रात्री दारूच्या नशेत हत्या केल्याचे रविवार भल्या पहाटे घटना उघकीस आली असून पती घटना एक स्थळावरून पसार झाला आहेतालुक्यातील विल्हाळा शेत शिवारातील गट न६५१ मध्ये किशोर डिगंबर पाटील (रा. सुसरी) यांच्या मालकीच्या शेतातील भाडेतत्वावर दिलेल्या विटभट्टीवर विटा तयार  करण्यासाठी मजुरीचे कामसाठी परळी वैजनाथ जि. बिड येथील नियाजउद्दीन शेख मन्सुर हे आपल्या परिवारा सोबत आले होते. सोबत मुलगी सना व जावाई अजीज हे सुद्धा आपल्या चार मुला सोबत कामाला आले होते तर सर्वच एकाच ठिकाणी वेगवेगळ्या पत्र्याची खोली मध्ये राहत होते अजीज सलीम शेख हा रोज दारूची नशेची सवय जडलेली असल्याने रोज रात्री पती पत्नीत कोणत्यातरी कारणा वरून भांडण होत होते शनिवारच्या रात्री नेहमी प्रमाणे अजीज दारू पिऊनअसताना शेजारीच असलेल्या आजीजच्या सासुने त्याचीसमजूत काढून जेवनाचा आग्रह करीत जेऊ घातल्या नंतर अजीज व पत्नी सना आपल्या मुलाबाळा सोबतत्याच्या पत्र्याच्या खोलीत झोपायाला  गेले तर उन्हाळ्याचे दिवस असल्याने विट्टा तयार करण्यासाठी सकाळी  लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची असल्याने सासुने त्यांना उठण्यासाठी आवाज दिला मात्र खोलीतून प्रतिसाद मिळत नसल्याने सासुने दरवाजा उघडताच समोरचे चित्र पाहून एकच हबरडा फोडण्याने विट भट्टी कामगार त्या ठिकाणी आल्या नंतर खोलीत डोकाऊन पाहीले तर सना मृत अवस्थेत अढळून आल्याने त्या ठिकाणी एकाच खळबळ उडाली

हत्यां नेमकी कशाने केली

सना अजीज शेख (वय २५) या महिलेचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे मात्र समजू शकले नाही कारण तीच्या डोळ्या नाकातून रक्त व गळ्यावर वर्ण दिसत असल्याने नेमकी हत्या कशाने केली हे समजू शकले नाही तर शवविच्छेदनाचा अहवाल आल्या नंतर हत्याचे कारण उघड होणारअसल्याचे पोलीसांनी सांगतलीघटना घडल्या नंतर पती अजीज सलीम शेख (वय ३३) हा पसार झाल्याने त्यानेच हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे या बाबत घटनेची माहिती मिळताच सह पोलीस निरिक्षक जनार्धन खंडेराव, पो कॉ सुकराम सावकारे मनोहर बनसोडे, भुषण माळी साहेबराव कोळी यांनी घटना स्थळी धाव घेत घटनेचा पंचमान करीत वैद्यकिय ठस्से तज्ञाला पाचरण केले तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बबनराव अव्हाड यांनी घटना स्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला मयत महिलाचा भाऊ अजहर नियाजउद्दीन शेख मन्सुर याच्या खबरी वरून अजीज सलीम शेख याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सपोनि जनार्धन खंडेराव करीत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी