बरेली :- शिपायाने पत्नीला 7 वेळा विषाचं इंजेक्शन दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या विषारी इंजेक्शनमुळे पत्नीचा मृत्यू झाला आहे. यासाठी पतीने दोन मित्रांची मदत घेतली. आरोपी रवी हा बरेली येथील पीएसी 8व्या बटालियानचा शिपाई आहे. रवी याने त्याच्या पत्नीची विषारी इंजेक्शन देऊन हत्या केली. ही हत्या करताना रवीने त्याचे मित्र शानू आणि जतीन याची मदत केली. या तिघांनीही मीनूची हत्या केल्याची कबुली दिली आहे.शानू कार डेंटर म्हणून काम करतो, तर जतिन हा खाजगी रुग्णवाहिका कर्मचारी आहे. जतिनला इंजेक्शन ड्रग्जच्या वापराबद्दल माहिती होती. मीनूची हत्या करण्यासाठी जतिन आणि शानू यांनी रवीसोबत 8 लाख रुपयांचा सौदा केला. हे दोघेही मीनूला प्लॉट विक्रेते असल्याचे भासवून भेटले आणि त्यांनी गाडीतच मीनूला 7 वेळा विषारी इंजेक्शन टोचले, यानंतर शानू आणि जतिन तिथून फरार झाले, तर रवी बेशुद्ध असल्याचे भासवून तिथेच पडून राहिला. रवीला त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करायचे होते, म्हणून त्याने मित्रांच्या मदतीने हा गुन्हा केला.
पत्नीच्या हत्येचा खतरनाक प्लान….
रामपूरचा रहिवासी रवी हा 8 व्या पीएसी बटालियनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून तैनात आहे. ऐक दिवशी दुपारी रवी त्याची पत्नी मीनूसोबत त्याच्या गाडीतून घराबाहेर पडला. औषध आणण्यासाठी बाहेर जात असल्याचं त्याने मीनूला सांगितलं. काही वेळाने रवीने त्याचा पोलीस मित्र संजय याला फोन केला आणि फरीदपूरमधील मंदिराजवळ काही जणांनी हल्ला केल्याचं त्याने संजयला सांगितलं. यानंतर काही वेळाने संजय तिथे पोहोचला, तेव्हा मीनू गाडीत पडलेली तर रवी बागेत पडलेला त्याला आढळला.यानंतर मीनूला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सोमवारी, मीनूच्या वडिलांनी रवीविरुद्ध मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
यानंतर पोलिसांनी रवी आणि त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले. तिघांचीही कडक चौकशी करण्यात आली. तिघांनीही मीनूची हत्या केल्याची कबुली दिली. घटनेनंतर जेव्हा पोलिसांना रवीच्या नंबरचा सीडीआर मिळाला तेव्हा त्यातून घटनेचे रहस्य उलगडले. रवीने त्याच नंबरवरून अनेक वेळा बोलल्याची पुष्टी झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा नंबर एका महिलेचा आहे. या महिलेमुळेच रवीने त्याच्या पत्नीची हत्या केली. चौकशीदरम्यान रवीने त्याच्या पत्नीवर आरोप केले आहेत.माझे आणि पत्नीचे संबंध चांगले नव्हते, ती सतत दुसऱ्या कुणाशीतरी बोलत बसायची, असा दावा रवीने केला आहे. पण रवी हे दावे फक्त त्याच्या बचावासाठी करत आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे.