Viral Video: सोशल मीडियावर बऱ्याचदा अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. बरेच व्हिडिओ मनोरंजक असतात, तर काही धक्कादायक. मात्र हल्ली अशा काही गोष्टी पाहण्यासाठी मिळतात ज्या एखाद्या चित्रपटात घडाव्यात तशाच वाटतात.सध्या अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे एका व्यक्तीला त्याच्या भूतकाळाच्या गोष्टीमुळे भररस्त्यात मार पडला आहे. हा सर्व प्रकार एका मोबाईल दुकानात घडा असून त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?……
घडले असे की एक व्यक्ती त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी नवा मोबाईल खरेदी करण्यासाठी जातो. दुकानात गेल्यानंतर तो व्यक्ती विविध प्रकारच्या मॉडेल्सचे मोबाईल पाहतो. सगळं काही सुरळीत सुरु होते. मात्र अचानक त्या मोबाईलच्या दुकानात त्या व्यक्तीची एक्स गर्लफ्रेंडमध्ये येते आणि सर्वच वातावरण बदलतं.
हाणामारीचा प्रकार कसा घडला?……
तरुणी त्या व्यक्तीला पाहताच तुफान आरडाओरडा सुरू करते आणि “तू मला विसरलास का? मला वचन दिलं होतंस शिवाय लग्न करशील असंही सांगितलं होतंस आणि आता होणाऱ्या बायकोसाठी मोबाईल घेतोयस?” असा जाब विचारता व्हिडिओ दिसत आहे. तरुणीने सांगितलेल्या या गोष्टीनंतर दुकानातील कर्मचारी आणि अनेक ग्राहकही हैराण झालेले व्हिडिओत दिसत आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल(Viral) झालेला आहे. काही दिवसात व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,”एकाच वेळी दोन व्यक्तीवर प्रेम केलंत,आता परिणाम भोग” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”चांगल चोपला पाहिजे” अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या तुम्ही पाहू शकता.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.






