दोन मुलांची आई तिच्या हत्येच्या आरोपात चौघे जेलमध्ये दीड वर्षांनी अचानक मयत महिला घरी परतली म्हणाली मी तर……. काय आहे प्रकरण वाचा.

Spread the love

मंदसौर :- दीड वर्षांपूर्वी मृत समजली गेलेली एक महिला अचानक परत आली आहे, यामुळे महिलेचं कुटुंब, शेजारी आणि पोलिसांनाही धक्का बसला आहे. कुटुंबाने या महिलेचे अंत्यसंस्कारही केले होते. या महिलेच्या हत्येप्रकरणी चार जणांना जेलमध्येही पाठवण्यात आलं होतं.ही महिला मंदसौरच्या नवली गावामध्ये राहत होती. कुटुंबाला महिलेच्या परत येण्यालवर विश्वासच बसत नव्हता. मुलगी परत आल्यानंतर तिचे वडील ताबडतोब मंदसौरच्या गांधी सागर पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलिसांना घडलेली सगळी हकीकत सांगितली.

शाहरुखसोबत गेली होती महिला…..

गांधी सागर पोलीस स्टेशनच्या प्रभारी तरुणा भारद्वाज म्हणाल्या की, महिलेने पोलिसांना सांगितले की ती मंदसौरच्या भानपुरा येथील शाहरुख नावाच्या पुरुषासोबत पळून गेली. दोन दिवसांनंतर, तिला कोटा येथील शाहरुख नावाच्या दुसऱ्या माणसाकडे सोपवण्यात आले. तेव्हापासून ती कोटा येथे राहत होती, पण पळून जाऊन घरी परतण्यात ती यशस्वी झाली.

आधार कार्ड दाखवलं…..

महिलेने ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र अशी कागदपत्रेही दाखवली. आम्ही हे प्रकरण झाबुआ येथील थांडला पोलीस स्टेशनकडे सोपवले आहे, जिथे तिच्या हत्येचा तपास करण्यात आला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.महिलेने ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र अशी कागदपत्रेही दाखवली. आम्ही हे प्रकरण झाबुआ येथील थांडला पोलीस स्टेशनकडे सोपवले आहे, जिथे तिच्या हत्येचा तपास करण्यात आला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

महिलेला दोन मुलं…..

या महिलेला दोन मुलं आहेत. या मुलांना महिला दीड वर्षांनी भेटली, त्यामुळे कुटुंबाला खूप आनंद झाला आहे. कुटुंबाला भेटल्यानंतर महिला थांडला पोलीस स्टेशनलाही गेली. 2023 मध्ये झालेल्या एका भीषण ट्रक अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिचे वडील रमेश यांनी एका मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेहावरचा टॅटू आणि पायाला काळा धागा बांधला असल्यामुळे, महिलेच्या वडिलांना हा आपल्याच मुलीचा मृतदेह असल्याचं वाटलं.

चार जण आरोपी…..

यानंतर कुटुंबाने महिलेवर अंत्यसंस्कार केले. महिलेच्या कथित हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली, ज्यांची नावं इम्रान, शाहरुख, सोनू आणि एजाज अशी आहेत. तेव्हापासून हे चारही जण जेलमध्ये आहेत. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह कुटुंबाकडे दिला आणि कुटुंबानेही महिलेवर अंत्यसंस्कार केले.या महिलेने पोलिसांना सांगितलं की, ती शाहरुख नावाच्या पुरुषासोबत पळून गेली होती, त्यानंतर तिला कोटा येथील दुसऱ्या शाहरुखकडे सोपवण्यात आले, त्यानंतर महिला तिथून पळाली आणि परत आली. पोलीस आता या प्रकरणाचा पुन्हा तपास करत आहेत. महिलेच्या परत येण्यामुळे मानवी तस्करीचं संभाव्य रॅकेटच्या दृष्टीनेही पोलीस तपास करणार आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी