Viral Video: दोन महिला शिक्षिकांची भर वर्गात विद्यार्थ्याच्या समोर फ्री स्टाईल हाणामारी,दोघींनी एकमेकांना धो धो धुतलं पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्त आणि संस्कारांचे धडे देतात, त्यांनीच जर WWE रिंगसारखी फाईट करायला सुरुवात केली, तर काय गोंधळ उडेल? सध्या असचं काहीसं भन्नाट प्रकरण एका शाळेत घडलंय, जिथे दोन महिला शिक्षिका एकमेकींवर चांगल्याच तुटून पडल्या आहेत शिवाय सर्व घटनेचा व्हिडिओस सोशल मीडिया माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे.व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला शाळा दिसत असून विद्यार्थ्यांची पळापळ सुरु आहे. मात्र, व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की, शाळेतील दोन महिला शिक्षिका एकमेंकीना मारताना दिसत आहे. दोघींची हाणामारी इतकी जोरदार आहे की त्या अक्षरश:एकमेंकीच्या अंगार बसून हाणत आहे.

अन्य शिक्षिका येऊन सर्व प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यातील कोणीही थांबण्याचे नाव घेत नाही.हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे शिवाय तो नेटकरी वर्गात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, हा व्हिडिओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लोकांनी हजारो लाईक्स मिळालेले असून मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळालेले आहे.आता काय होणार?या शिक्षिकांचा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. शिवाय या शिक्षिकांना आता निलंबित करणार का? असा सवाल अनेक नेटकरी वर्गातून विचारला जात आहे. त्यातील एका यूजरने कमेंट केली,”धम्माल हाणामारी केली राव” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”कसं व्हायच विद्यार्थ्यांच” तर काहींनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

मुख्य संपादक संजय चौधरी