धक्कादायक! शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचं अश्लील चाळे लपून बघणाऱ्या विद्यार्थ्यांना चोपलं संतापलेल्या पालकांनी शाळेलाच कुलूप लावलं.

Spread the love

गडचिरोली :- शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापक आणि शिक्षिकेने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला.कारवाईच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी शाळेलाच कुलूप लावलं. ही घटना समोर येताच या दोघांना देखील सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जयनगर जिल्हा परिषद शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचे वर्गातच खुल्लम खुल्ला प्यार सुरू होते. ज्या विद्यार्थ्यांनी या दोघांचे अश्लील चाळे पाहिले त्यांनाच दोघांनी फटकवलं. या घटनेमुळे गडचिरोलीमध्ये खळबळ उडाली. या घटनेवरून संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला कुलूप लावले. शाळा व्यवस्थापन समितीने या दोघांच्या प्रेमप्रकरणाची दखल घेत दोघांनाही सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी केली. मुख्याध्यापक जितेंद्र मंडळ आणि शिक्षिका कोमल साखरे शाळेतच विद्यार्थ्यांपुढे अश्लील चाळे करतात.

हे त्यांनी पहिल्यांदाच नाही केले तर ते नेहमी वर्गात विद्यार्थ्यांसमोर असे कृत्य करायचे. या घटनेच्या निषेधार्थ म्हणून दोघांनाही सेवेतून बडतर्फ होईपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला. मुख्याध्यापक आणि शिक्षिका शाळेत नेहमी अश्लील चाळे करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि मनावर परिणाम होत असल्याचा आरोप, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी केला आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी