Viral Video: सोशल मीडियाच्या जमान्यात रील्स करणं किंवा ट्रेंडिंग रिल्स करण्यची क्रेझ वाढत आहे. विशेष म्हणजे, तरुणांपासून प्रत्येक वयात हे वेडच बनले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी बरेजचण काहीही करण्याचे धाडस करतात.मात्र, कधी कधी हे प्रकार जीवावरही बेतू शकतात आणि तसाच एक दुर्देवी प्रकार नुकताच समोर आलेला आहे.एका व्यक्तीने स्टंटसाठी रिक्षावर उभं राहून डान्स करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोल गेल्याने तो व्यक्ती थेट जमिनीवर कोसळला आणि या अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.
हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे. विशेष म्हणजे, या घटनेने पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादाने व्यक्ती किती मोठे संकट ओढावून घेतो, याचा धक्कदायक प्रत्यय आलेला आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला, एक भरचौकात एक रिक्षा आहे, ज्यावर एक व्यक्ती उभा असून डान्स करत आहे. त्याचा डान्स व्हिडिओ रस्त्यावर असलेले काहीजण मोबाईलमध्ये कैद करत आहेत तर काहीजण सर्व प्रकार लांबून पाहत आहेत. मात्र, रिक्षावर डान्स करत असताना अचानक रिक्षा सुरु होऊन पुढे जाते. त्यातच त्या व्यक्तीचा तोल जातो आणि जमिनीवर जोरदार पडला जातो.
जमिनीवर पडताच त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. सर्व प्रकार रील्स व्हिडिओ शूट करत असलेल्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.या दुर्घटनेनंतर त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून हा व्हिडिओ (Video)@SachinGuptaUP या अकाउंटवर अपलोड करण्यात येत आहे. सर्व प्रकार उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील असल्याचे समोर आले आहे आणि अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत. अनेकांनी संतापजन प्रतिक्रिया केल्या आहेत तर काहींनी समिश्र प्रतिक्रिया केलेल्या आहेत.टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.






