Viral Video:प्लॅटफॉर्मवर धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्नात १४ वर्षीय मुलीला ट्रेनखाली चिरडण्यापासून वाचवलं देवदूत म्हणून आला जीआरपी जवान पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video :- रेल्वे स्थानकावर बऱ्याचदा अपघाताच्या घटना घडताना दिसतात. रेल्वे पकडताना किंवा रेल्वेमधून उतरताना लोकांनी गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे, ज्या घटनेत एका १४ वर्षीय मुलीचा जीव जीआरपी जवानामुळे बचावला गेला आहे.नेमकी घटना कशी घडली?ही घटना मध्य प्रदेशमधील एका रेल्वे (Railway) स्थानकावर घडली असल्याचे समजते. घडलेल्या घटनेत तुम्ही पाहू शकता, प्लॅटफॉर्मवर धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करत असताना दोनजण दिसत आहे. ज्यामध्ये एका मुलीचा आणि एका व्यक्तीचा समावेश आहे.

काही क्षणात मुलगी धावती ट्रेन पकड असताना तिचा तोल जातो.जीआरपी जवानाने दाखवली प्रसंगावधानतात्यानंतर तशीच मुलगी प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मधे अडकली जाण्याची शक्यता असते. मात्र, प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेला एक जीआरपी जवान मुलीच्या मदतीस धावून जातो आणि तिला बचावतो. सर्व धक्कादायक घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेली घटना कधीची आहे हे कळू शकलेले नाही. मात्र, सध्या तुफान व्हायरल होत आहे. संपूर्ण थराराचा व्हिडिओ एक्सवरील NewsPlus_21 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. हा प्रकार पाहिल्यानंतर लोकांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया केलेल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली,” अशा लोकांमुळे वारंवार हे घडतं” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”त्या वाचवणाऱ्या व्यक्तीचे खूप खूप कौतुक” अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

मुख्य संपादक संजय चौधरी