पुणे :- राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्दळीच्या ठिकाणी दुकानात चोरी करून पसार झालेल्या आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्याकडून ४ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चोरी करणारा आरोपी स्वतः व्यवसायाने सोनार आहे.संपूर्णानंद परमानंद वर्मा (वय ४३, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो व्यवसायाने सोनार असून, त्याने पत्नीच्या मदतीने चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक संजय नरळे व त्यांच्या पथकाने केली आहे.गेल्या महिन्यात (दि. २५ मार्च) वारजेतील अष्टविनायक चौक येथील शमशादा शेख यांच्या दागिन्यांच्या दुकानात चोरी झाली होती. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ४ लाख ५७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत शेख यांनी तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीचा माग काढला. उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसरातील १५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले.शेवटी खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार अमित शेलार यांनी दिलेल्या माहितीवरून छापा टाकून कारवाई केली.
त्याच्याकडून दोन लाख रोख, २५० ग्रॅम चांदीचे दागिने व ६७ ग्रॅम सोन्याचे दागिने (२,१०,०००/- रुपये) असा एकूण ४,२७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शेख दागिने घरात ठेवण्याऐवजी दररोज दुकानात घेऊन येत व संध्याकाळी पुन्हा घरी नेत असत. मात्र गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांची आयुष्यभराची पुंजी लंपास केली होती.६ लाखांची रोकड पळवलीपुणे शहरात पुन्हा गाडीतून रोकड चोरून नेणारे चोरटे ‘अॅक्टीव्ह’ झाल्याचे दिसत असून, पर्वती दर्शनमध्ये कारची काच फोडून ५ लाखांची रोकड चोरून नेली आहे. तर, मार्केटयार्ड परिसरात मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून १ लाखांची रोकड लांबविली आहे. दोन्ही घटनात ६ लाखांची रोकड पळविण्यात आली आहे. त्यामुळेच पुन्हा हे चोरटे अॅक्टीव्ह झाल्याचे दिसत आहे.