एरंडोल :- शहरासह ग्रामीण भागातील विविध सामाजिक संघटना,शैक्षणिक संस्था तसेच शासकीय कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.उत्सव समितीच्यावतीने रविवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ देशभक्तीपर गीते तसेच भिम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सोमवारी सकाळी शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली.आमदार अमोल
पाटील यांचेहस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
रॅलीत सहभागी झालेल्या युवकांनी मोटरसायकलवर लावलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले निळ्या रंगाचे ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.आमदार अमोलदादा पाटील, उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड,तहसीलदार प्रदीप पाटील,पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड,युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,रवींद्र महाजन,दशरथ महाजन,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,निवृत्त अधीक्षक अभियंता शांताराम गायकवाड, निवृत्त तहसीलदार अरुण माळी एकलव्य सेनेचे पंढरीनाथ मोरे, यांचेसह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या पदाधिका-यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
उत्सव समितीच्यावतीने कार्याकार्मास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे संविधान पुस्तिका व संविधानाचे शिल्पकार हे
पुस्तक देवून स्वागत करण्यात आले.यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी, जगदीश ठाकूर,डॉ.सुरेश पाटील,डॉ.राजेंद्र चौधरी,मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुधीर काबरा,मयूर महाजन,डॉ.फरहाज बोहरी,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,व्यापार आघाडी प्रमुख
परेश बिर्ला यांचेसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीवर ठिकठीकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी मिरवणुकीस भेट देवून शिस्तबद्ध मिरवणुकीबद्दल समाधान व्यक्त केले.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष लखन बनसोडे,उपाध्यक्ष पंकज चौधरी,नितीन बोरसे,कार्याध्यक्ष प्रवीण बाविस्कर,सचिव मोहन सैंदाणे,अवी सोनवणे,कार्याध्यक्ष आकाश अहिरे, संघरत्न गायकवाड, मोहन सैदाने, प्रवीण केदार,प्रा.भरत शिरसाठ,प्रा.संदीप कोतकर, डॉ.अतुल सोनवणे,उमेश सूर्यवंशी,भैय्या अहिरे,मनोहर बोंडरे, रणजीत मोरे, संजय खैरनार,प्रा.नरेंद्र गायकवाड,कैलास गायकवाड, आनंद सोनवणे,रवी बोरसे,प्रकाश शिंदे यांचेसह पंचशील मित्र मंडळ, रमाबाई आंबेडकर मित्र मंडळ,सम्राट मित्र मंडळ.ब्लू बॉईज ग्रुप.राजे संभाजी ग्रुपच्या पदाधिका-यांनी सहकार्य केले.
दादासाहेब पाटील महाविद्यालय.
एरंडोल-येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दादासाहेब पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांचेहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.कार्यक्रमास प्राचार्य डॉ.ए.जे.पाटील, उपप्राचार्य डॉ.अरविंद बडगुजर,कनिष्ट विद्यालयाचे उपप्राचार्य आर.एस.पाटील,पर्यवेक्षक प्रा.नरेंद्र गायकवाड,जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण केदार,मुख्याध्यापिका संगिता वाघ,प्रा.डॉ.एन.एस.तायडे,कुलसचिव बोरसे,प्रा.डॉ.राम वानखेडे,डॉ.संदीप कोतकर,शेखर पाटील,प्रा.हेमंत पाटील, ताडे येथील मुख्याध्यापक आर.एस.पाटील यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचारी उपस्थित होते.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी
प्रा.विजय गाढे यांनी सुत्रसंचलन केले.प्रा.योगेश एंडाईत यांनी
प्रास्ताविक केले.प्रा.डॉ.सविता पाटील यांनी आभार मानले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
श्रीमती के.डी.पाटील इंग्लिश स्कूल.
येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीमती के.डी.पाटील इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये अध्यक्ष अमित पाटील यांचेहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.यावेळी अध्यक्ष अमित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास प्राचार्य दिनानाथ पाटील,शेखर पाटील यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
काबरे विद्यालय.
येथील एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.मुख्याध्यापिका दीपा काबरे अध्यक्षस्थानी होत्या.मुख्याध्यापिका दीपा काबरे,उपमुख्याध्यापक पी.एच.नेटके, श्रीमती एस.एस.श्रावणे यांचेसह विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्याविषयी माहिती दिली.व्ही.एस.नावाल यांनी सुत्रसंचलन केले.कार्यक्रमास शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.