नदीत बुडत असलेल्या पांच वर्षाच्या मुलास वाचविण्यासाठी आई अन् मावशीचे घेतली पाण्यात उडी तिघांच्या दुदैवी मृत्यू.

Spread the love

यावल :- नदीत बुडालेल्या पाच वर्ष मुलाला वाचवण्यासाठी आई व मावशीने नदीत उडी घेतली. या घटनेत पाच वर्षीय मुलासह आई व मावशीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जळगावच्या यावल तालुक्यातील अंजाळे गावात ही घटना घडली आहे.वैशाली सतीश भिल (आई), 5 वर्षीय मुलगा नकुल सतीश भिल आणि मावशी सपना गोपाळ सोनवणे (वय 27 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अंजाळे येथे नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी तिघेही जण आले होते. कार्यक्रमानंतर कपडे धुण्यासाठी गावाजवळच असलेल्या तापी नदीवर ते गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली आणि सपना या नकुलसह तापी नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते.तिथेच नकुल खेळता-खेळता नदीच्या पाण्यात गेल्या. तोल गेल्यान तो नदीच्या पाण्यात बुडू लागला. मुलगा नदीत बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी आई व मावशीनेही नदीत उडी घेतली. मात्र दोघींनाही पोहता येत नसल्याने या घटनेत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.सोबत असलेल्या अनु सतीश भील या बालिकेने धावत जाऊन ही माहिती घरच्यांना दिली. त्यानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.

स्थानिक तरुणांनी शोध घेत त्यांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत आई वैशाली सतीश भील, तिचा मुलगा नकुल व मावशी सपना गोपाळ सोनवणे या तिघांचा मृत्यू झाला असून यावल पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी