Viral Video: – आई-वडिलांनंतर प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य घडवण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देतात, त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देतात.मात्र, काही शिक्षक अशाही भूमिका बजावतात ज्या समाजासाठी घातक ठरू शकतात. अशाच एका संतापजनक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना दारू पाजल्याचे दिसून येते.
ही घटना madhya pradesh मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील आहे. येथे खिरहानी गावातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत असलेला शिक्षक लाल नवीन प्रताप सिंह याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका बंद खोलीत सात अल्पवयीन विद्यार्थ्यांसमोर कपमध्ये दारूचा पॅग कसा तयार करायचा, हे शिकवताना दिसतोय. इतकंच नव्हे, तर एका विद्यार्थ्याला स्वतः दारू देत ती पिण्यापूर्वी पाणी मिसळण्यास सांगतानाही ऐकू येतोय. धक्कादायक बाब म्हणजे, हे विद्यार्थी अगदी सहजपणे एकामागून एक दारूचे घोट घेत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते.
कठोर कारवाईचे आदेश…..
हा व्हिडीओ viral video शुक्रवारी जिल्हाधिकारी दिलीप कुमार यादव यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना संबंधित शिक्षकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनीही तत्काळ कार्यवाही करत या प्राथमिक शिक्षकाला निलंबित केले आहे.निलंबन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांना दारू पिण्यास प्रवृत्त करणे ही अत्यंत निंदनीय आणि शिक्षकाच्या प्रतिष्ठेला कलंकित करणारी कृती आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेनंतर समाजातील अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिक्षकानेच जर अशी विकृती दाखवली, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संबंधित शिक्षकावर पुढील शिस्तभंगाची कार्यवाही होण्याची शक्यता आहे.