Viral Video :”तू माझ्या आईला शिवीगाळ कशी काय करू शकतेस?” एकमेकींच्या झिंज्या उपटत दोन महिलांमध्ये तुफान राडा पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video : महिलांमध्ये लहानसहान कारणांवरून भांडण झाल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यायध्ये महिला एकमेकांचे केस पकडून, लाथा- बुक्क्यांनी, लाठ्या-काठ्यांनी मारहाण करताना दिसतात.त्यातील काही व्हिडीओंतील दृश्य तर फारच भयानक असतात. सध्या सोशल मीडियावर एका सोसायटीतील दोन महिलांच्या हाणामारीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ही घटना नोएडाच्या सेक्टर १६७ मधील पारस सीझन सोसायटीमधील असल्याचे सांगितले जात आहे.

त्यात सोसायटीच्या मेन गेटवर दोन महिला एकमेकींना अशा विचित्र प्रकारे मारतायत की, ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेचे अक्षरश: केस धरून जोरात ओरडताना दिसतेय. जिने दुसऱ्या महिलेचे केस धरलेत, त्या दुसऱ्या महिलेने तिच्या आईला शिवीगाळ केल्यामुळे ही मारामारी झाल्याचे समजते. दरम्यान, काही वेळाने हे प्रकरण पोलिसांना बोलावण्यापर्यंत पोहोचले.

वाद नेमका कशावरून झाला?….

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला ‘माझ्या आईला शिवी का दिली? पोलिसांना बोलवा, तिची माझ्याशी असे बोलण्याची हिंमतच कशी झाली?’ असे म्हणत ती दुसऱ्या महिलेचे केस घट्ट धरून, तिला ओढताना दिसतेय. यावेळी इतर महिला दोघांचे भांडण सोडवण्यासाठी पुढे येतात; पण केस धरून राहिलेली महिला त्या दुसऱ्या महिलेला सोडण्यास तयारच होत नाही. ती फक्त पोलिसांना बोलवा, असे म्हणत जोरजोरात ओरडताना दिसतेय. इतर महिला तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात. पण ती इतकी संतापलेली दिसतेय की, ती त्या महिलांनाही दूर ढकलतेय. तसेच वारंवार तीच गोष्ट म्हणते, ‘तू माझ्या आईला शिवीगाळ कशी काय करू शकतेस?’ भररस्त्यात महिलांची सुरू असलेली मारामारी पाहून तिथे बघ्यांची मोठी गर्दी जमा होते. यावेळी प्रत्येक जण तिला समजावण्याचा प्रयत्न करतो; पण ती कोणाचेच ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही.

महिलांच्या मारामारीचा हा धक्कादायक व्हिडीओ @siddharth2596 नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, नोएडाच्या सेक्टर-१६८ मधील पारस सीझन सोसायटीच्या मुख्य गेटवर दोन महिलांमध्ये भांडण झाले. या व्हिडीओवर आता लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिलेय की, जर सुशिक्षित समाजातही संवादाऐवजी हाणामारी होऊ लागली, तर परिस्थिती खरोखरच विचार करण्यासारखी आहे.दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, कोण इतके हायपर होत यार… तिसऱ्याने लिहिलेय की, मॅडम, तुम्ही पोलिसांना बोलवू शकता; पण त्या गरीब मुलीचे केस सोडा. चौथ्याने लिहिलेय की, स्त्री ही स्त्रीची शत्रू बनली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी