Viral Video:एक्स्प्रेसवेवर तरुणांची सुसाट वेगाने बाईक चालवत जीवघेणी स्टंटबाजी; तोल जाताच कोसळले, मागून आला ट्रक अन् पहा काळजात धडकी भरेल असा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video : रस्त्यावरून वाहन चालवताना सावकाश चालवा असे वारंवार सांगूनही अनेक तरुण शो-शायनिंग मारण्यासाठी जीवाशी खेळताना दिसतात. बाईक म्हणजे जणू खेळणं समजून ती रस्त्यावर चालवत असतात. यावेळी स्वत:च्या नाहीच, पण इतरांच्या आयुष्याची देखील त्यांना पर्वा नसते. अशावेळी स्टंटबाजीच्या नादात ते स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात टाकतात. सध्या तरुणांचा बाईकवरील जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

तुम्ही एक्स्प्रेस वेवर पाहिलं असेल, अनेक तरुण सुसाट वेगाने बाईक चालवत असतात; यावेळी ते जीवघेणी स्टंटबाजी करतानाही दिसतात. पण, बाईक स्टंटबाजी करण्यासाठी सराव लागतो अन्यथा त्याचे जीवघेणे परिणाम भोगावे लागतात हे तुम्हीही बघितले असेल. पण, कोणताही सराव नाही काही नाही, फक्त बाईक हातात आहे म्हणून कशीही शायनिंग मारत चालवायची, हे आजकाल दिसून येतं.

बाईकवर बसलेले दोन्ही तरुण जोरात खाली कोसळले अन्…..

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, अशाचप्रकारे काही तरुण एका एक्स्प्रेस वेवर सुसाट बाईक चालवत होते. रस्ता दिसेल तशी बाईक वाकडी-तिकडी करत ते मज्जा मस्तीत जात होते. एक बाईक सुसाट वेगात पुढे जाते, पण मागून येणाऱ्या दुसऱ्या बाईकस्वाराचा स्टंटबाजीच्या नादात तोल जातो आणि तो कोसळतो. यावेळी बाईकवर बसलेले दोन्ही तरुणही जोरात खाली कोसळतात आणि कोलांट्या उड्या घेत फरपटत पुढे जाऊन पडतात. यावेळी मागून एक भरधाव वेगात ट्रक येत असतो, पण सुदैवाने दोन्ही तरुण कसेबसे उठतात आणि धावत रस्त्याच्या कडेला जातात. धक्कादायक बाब म्हणजे स्टंटबाजी करत असताना या दोन्ही बाईकवरील तरुणांनी हेल्मेट घातलेले नव्हते. जर चुकूनही ते तरुण ट्रकच्या चाकाखाली आले असते तर मोठा अपघात घडला असता. पण, त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले.या जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @Lollubee नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर आतापर्यंत अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘त्यांना सपोर्ट न करता त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करायला हवी भाऊ.’ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘अजून खेळा रील-रील, असेच होऊ शकते तुमच्याबरोबरपण.’ तिसऱ्याने लिहिले की, ‘कोणताही विचार न करता स्टंटबाजी करण्याचे आणि निष्काळजीपणाचे हे परिणाम आहेत.’

मुख्य संपादक संजय चौधरी