Viral Video: धावत्या लोकल ट्रेनमधून उतरण्याच्या नादात 3 मुलींची उडी सुदैवाने……थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video: धावत्या मुंबई लोकलमधून उतरण्याच्या प्रयत्नात तीन तरुणींना जीव गमावण्याची वेळ आली होती, जी घटना अत्यंत धक्कादायक आहे. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या काळजाता ठोका चुकू शकतो.

काय आहे व्हिडिओमध्ये?

या व्हायरल (Viral)व्हिडिओमध्ये दिसतं की, लोकल ट्रेन स्टेशनवर येते आणि अनेक प्रवाशी ट्रेनमध्ये चढत असतात. त्यातही तीन तरुणी त्या ट्रेनमधून उतरुन ट्रेनच्या दुसऱ्या डब्ब्यात चढताना दिसत आहेत. मात्र, ट्रेन सुरु झाल्याने त्यातील एक तरुणी प्लॅटफॉर्मवर राहिली जाते, त्यामुळेच ट्रेनमध्ये चढलेल्या तिच्या मैत्रिणी धावत्या ट्रेनमधून उतरतात.धावत्या ट्रेनमधून उतरण्याच्या नादात दोघीही प्लॅटफॉर्मवर पडतात. सुदैवाने ट्रेनमधील पोलिस कर्मचाऱ्यामुळे एक तरुणी ट्रेनच्या खाली जाण्यापासून बचावली जाते. तात्काळ घडलेल्या या घटनेमुळे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशी हैराण झाले आणि ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

ही घटना कधीची आहे आणि कुठल्या स्टेशनवरील आहे याची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, हा व्हिडिओ (Video) सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून एक्सवरील @quaiser_khalid या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. ऐवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: रेल्वे स्टेशनवरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

मुख्य संपादक संजय चौधरी