Viral Video:नवरीला लागली हळद,रात्री नाचताना नवरीच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,ज्या दिवशी तिचे लग्न त्याच दिवशी निघाली अंत्ययात्रा, दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा

Spread the love

Viral Video:आजकाल कुणाचं कधी काय होईल ते सांगता येत नाही. सध्या अकाली मृत्यूचे प्रमाण फार वाढले आहे. याचे प्रचिती दिवसेंदिवस सोशल मीडियावरही मिळू लागली आहे. मागील काही काळापासून सोशल मीडियावर अशा अकाली मृत्यूच्या घटनांचे अनेक व्हिडिओज शेअर करण्यात आले आणि ते व्हायरलही झाले.अशातच आता यात आणखीन एका घटनेचा समावेश झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका हृदयद्रावक घटना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. यात लग्नाच्या आदल्या दिवशीच वधूला हृदयविकाराचा झटका इलायची घटना घडून आली आहे. वधूच्या लग्नसमारंभाचे व्हिडिओ आणि फोटोज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लग्नाच्या एक दिवस आधी रविवारी हळदी समारंभात नाचत असताना वधूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा पसरली. ज्या दिवशी लग्नाची डोली उठणार त्याच दिवशी नवरीची अंत्ययात्रा उठली जे पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. माहितीनुसार, सोमवारी मुरादाबादहून लग्नाची मिरवणूक निघणार होती. इस्लामनगर पोलिस स्टेशन परिसरातील नूरपूर पिनोनी गावातील रहिवासी इलेक्ट्रिशियन दिनेश पाल सिंग यांची २० वर्षीय मुलगी दीक्षा हिचे लग्न मुरादाबादमधील शिवपुरी येथील रहिवासी मदनलाल यांचा मुलगा सौरभ याच्याशी झाले होते. सोमवारी शिवपुरीहून लग्नाची मिरवणूक निघणार होती. रविवारी रात्री मेहंदीचा कार्यक्रम चालू होता. दीक्षाच्या मैत्रिणींनी तिला नाचण्यासाठी बोलावले.

मित्र-मत्रिणी, कुटुंबासह ती आनंदाने नाचत होती. यादरम्यान रात्री १.३० च्या सुमारास दीक्षा नाचत असताना पडली. तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला पोटात आणि छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या, त्यानंतर काही वेळातच ती मृत्यू पावली. क्षणार्धात लग्नातील आनंदाचे रूपांतर शोकात झाले. जेव्हा वराच्या कुटुंबाला हे कळले तेव्हा भावी सासरच्या घरातही शोककळा पसरली. दीक्षाच्या मृत्यूनंतर, कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की तिच्या हृदयाचे वॉल्व कमकुवत आहेत, त्यांच्यावर दिल्लीत उपचार झाले. ती बरी झाल्यानंतरच तिचे लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ऐनलग्नावेळी मुलीच्या अशा मृत्यूने संपूर्ण कुटुंब खचून गेले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

मुख्य संपादक संजय चौधरी