महिलेवर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! दिराने वहिनीला अर्धनग्न केलं अन्…… पुढे काय घडलं.

Spread the love

चंपारण :- शुल्क वादावरून दिराने आणि जावेने स्वत:च्या वहिनीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडित महिलेला अर्धनग्न करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला

बिहारमध्ये एका महिलेवर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या. या घटनेमध्ये पीडित महिलेच्या स्वतःच्या दिराने आणि जावेने तिच्याशी क्रूर वर्तन केल्याचा आरोप आहे. दिराने त्याच्या वहिनीला अर्धनग्न करून बेदम मारहाण केली आहे. ही घटना बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यात घडली. योगापट्टी येथे एका महिलेला तिच्या दिराने आणि जावेने अर्धनग्न करून मारहाण केली. एवढेच नाही तर पीडित महिलेल्या मारण्याच्या उद्देशाने गळा दाबण्यात आला.महिलेच्या मानेवर गळा दाबून मारल्याच्या खुणा आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी घडल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी महिलेची ओळख पटली असून ती स्थानिक पोलिस स्टेशन परिसरातील बालुआन पारेगवा गावातील रहिवासी मोहन राम यांची ३० वर्षीय पत्नी आहे. गरिबीमुळे, मोहन दिल्लीत राहतो आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी मजूर म्हणून काम करतो असे सांगण्यात आले आहे.याप्रकरणी स्थानिक सीएचसीचे डॉक्टर आझाद म्हणाले की, महिलेवर प्रथमोपचार करण्यात आला आहे. महिलेच्या मानेवर गळा दाबल्याच्या खुणा होत्या आणि तिच्या नाकातून रक्त येत होते . या प्रकरणानंतर तात्कार महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे आणि तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जखमी महिला ममता देवी म्हणाली की, तिचा तिच्या दीराशी शुल्क कारणावरून वाद झाला होता. याच रागाच्याभरात दीराने आणि पीडितेच्या जावेने महिलेला अर्धनग्न करून मारहाण केली. पीडित महिलेल्या ठार मारण्याच्या उद्देशाने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला.मात्र खूप प्रयत्नानंतर पीडित महिलेने कसाबसा तिचा स्वत:ची सुटका करून घटनास्थळावरून पळ काढला. पीडित महिलेचा नवरा दिल्लीत राहतो आणि मजूर म्हणून काम करतो आणि तिची मुले अजूनही खूप लहान आहेत. या संदर्भात एसएचओ कांचन भास्कर म्हणाले की, पोलिसांना अर्ज मिळालेला नाही, अर्ज येताच चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

गुन्ह्यांमध्ये वाढ

सध्या जगभरात गुन्ह्यांची वाढ होताना दिसत आहे आणि बिहारमध्ये तर न मोजता येण्याइतके गुन्हे होत असल्याचे दिसून येत आहे. आता बिहारमधील या गुन्ह्याचा अंत नक्की काय होणार आणि कोणती शिक्षा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पीडित महिलेने खूप प्रयत्नपूर्वक यातून आपली सुटका करून घेतल्याचेही पोलिसांनी यावेळी नमूद केले आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी