शासकीय ज्वारी खरेदीत वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांना पुर्णविराम लागण्यासाठी आवश्यक ते नियोजन करूनच खरेदी सुरू करा…आ.अमोलदादा पाटील

Spread the love

पारोळा :- येथील शासकीय हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत शेतकरी सहकारी संघामार्फत ज्वारी खरेदी केंद्राचे उद्घाटन आज रोजी आ. अमोलदादा पाटील यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, तहसिलदार डॉ.उल्हास देवरे, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक सुधाकरआण्णा पाटील, सुभाषआप्पा पाटील, साहेबरावदादा पाटील, पुरवठा अधिकारी शिवकुमार निरगुळे साहेब, पुरवठा निरिक्षक विश्वजित गिरासे साहेब, पत्रकार विश्वास चौधरी, राकेश शिंदे, भुपेंद्रभाऊ मराठे, योगेश पाटील, शेतकी संघाचे व्यवस्थापक भरत पाटील, शंतनु पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी मधुकर महाले, सुर्यकांत बोरसे यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

या रब्बी हंगाम २०२४-२०२५ शासकीय भरड धान्य ज्वारी खरेदीसाठी एकुण १६०८ शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पुर्ण केलेली आहे, ज्वारी खरेदीसाठी ३३७१/- रू.एवढा हमीभाव देण्यात येणार आहे, शासनाकडुन ज्वारी खरेदीचे १०००० क्विंटल एवढ्या उद्दीष्टासह उत्पादक्ता १६.९० प्रति हेक्टर निश्चित करण्यात आली आहे. या ज्वारी खरेदीचे प्रथम शेतकरी म्हसवे येथील रमेश बापुराव पाटील हे यांचे देखील यावेळी स्वागत केले.

शासकीय ज्वारी खरेदीत वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांना पुर्णविराम लागण्यासाठी आवश्यक ते नियोजन करूनच खरेदी सुरू करा. खरेदीवेळी येत असलेल्या अडचणी या वेळीच सोडविण्यात याव्या, या खरेदीसाठी मी बारकाईने लक्ष ठेवुन असल्याने खरेदीवेळी शेतकरी बांधवांना अडचणींसाठी तत्पर असुन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी ज्वारी हमीभाव योजनेअंतर्गत हमीभावाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी शेतकरी बांधवांना केले.

मुख्य संपादक संजय चौधरी