सावत्र बापाने जन्मदात्या आईच्या समोर दीड वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याला आपटुन संपविल नंतर जमिनीत पुरलं पती पत्नी दोघांना अटक.

Spread the love

धुळे :- जिल्ह्याला हादरवून टाकणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रामी गावात दारूच्या नशेत सावत्र बापाने आपल्या दीड वर्षांच्या निष्पाप मुलाला जमिनीवर आपटून ठार केले.विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना मुलाच्या जन्मदात्या आईच्या डोळ्यासमोर घडली. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी सावत्र बापासह जन्मदात्या आईलाही अटक केली आहे.

सोनगीर पोलिसानं कडून मिळालेल्या माहितीनुसार, सावत्र बाप पंकज बागुल याने दारूच्या नशेत अवघ्या दीड वर्षांचा मुलगा कार्तिकचा जीव घेतला. रागाच्या भरात दीड वर्षांच्या कार्तिकला पंकजने जोरात जमिनीवर आपटलं. या कार्तिकचा जागेवरच जीव गेला. विशेष म्हणजे ही घटना आई सुरेखा बापू सोनवणेच्या डोळ्यादेखत घडली.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुरेखा बापू सोनवणे या महिलेचा पती हा मध्यप्रदेशात असून त्याच्याशी जमत नसल्याने ती आपल्या दीड वर्षाचा कार्तिकसोबत रामी गावात राहत होती. लामकानी गावातील रहिवासी पंकज बापू बागुल याचे सुरेखाशी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर सुरेखा मुलगा कार्तिक आणि पंकज बागुल हे तिघे सागर गुलाब गिरासे यांचे शेतात कामानिमित्त गेल्या चार महिन्यापासून राहत होते.

नेमकं काय घडलं?

पंकज सुरुवातीपासूनच कार्तिगचा राग राग करत असे. कार्तिकला छोट्या-छोट्या कारणांवरून मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी देखील कार्तिक रडायला लागल्याने नराधम पंकजने त्याला मारहाण करत जोरात जमिनीवर आपटलं. यात कार्तिकचा जागेवरच जीव गेला. त्यानंतर त्याने कार्तिकचा मृतदेह बाजूच्या शेतात पुरला. पंकजच्या या सर्व कृत्यात सुरेखाची देखील त्याला साथ होती.

प्रकरण कसे उजेडात आले?

सुरेखा बापू सोनवणे या महिलेचा पती मध्य प्रदेशात राहत असून, त्यांच्यात सलोखा नसल्याने सुरेखा आपला दीड वर्षाचा मुलगा कार्तिकसोबत रामी गावात राहत होती. याच काळात लामकानी येथील रहिवासी पंकज बापू बागुल याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर सुरेखा, मुलगा कार्तिक आणि पंकज बागुल हे तिघे गेल्या चार महिन्यांपासून सागर गुलाब गिरासे यांच्या शेतात कामानिमित्त राहत होते.कार्तिक दिवसभर घराभोवती खेळत असे. मात्र काही दिवसांपासून कार्तिक दिसला नाही म्हणून सागर गिरासे यांनी सुरेखा आणि पंकजकडे त्याची चौकशी केली. त्यावेळी तो गावी गेल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र गिरासे यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी केलेल्या तपासात, सावत्र बाप पंकजने दारूच्या नशेत कार्तिकला मारून त्याचा मृतदेह शेतात पुरल्याचे समोर आले. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सावत्र बापासह जन्मदात्या आईलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेने धुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी