
एरंडोल :- पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार, रूपाली विश्वनाथ पाटील राहनार जहांगीरपुरा .ता. एरंडोल जि. जळगाव ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होत्या.२३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता रूपाली पाटील या महिलेने राहत्या घरातील वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली होती.आत्महत्या करण्यापुर्वी महिलेने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, “एका अज्ञात व्यक्तीने केलेली बदनामी मी सहन करू शकले नाही” असे नमूद केलेले आढळून आले आहे. ससाईड नोट एरंडोल पोलीसांनी जप्त केली आहे.
मृत महीलेने एका डायरीत सुसाईड नोट लिहून ठेवली होती. एका अज्ञात व्यक्तीने केलेली माझी बदनामी मी सहन करू शकले नाही असे नमूद केले होते. त्यावरून मृत महीलेच्या पित्याने श्रीराम पाटील यांनी ८ मे २०२२ रविवार रोजी एरंडोल पोलिस स्टेशन ला फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहीरे, जुबेर खाटीक, अकील मुजावर, मिलींद कुमावत, राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
लिहून ठेवलेली चिठ्ठीतील मजकूर असा…
विवाहिता रूपाली पाटील हिने वहीमध्ये लिहून ठेवलेले मिळाले यामध्ये लिहिले आहे की माझ्या मृत्यूबद्दल घरच्यांना दोषी ठरू नये माझी अज्ञात व्यक्तीने केलेली बदनामी सहन करू शकले नाही. माझ्या आई-वडिलांना माझ्या दंडवत, माझ्या बहिणीस अखेरचा निरोप माझ्या पर्समधील कमळ माझ्या मुला-मुलींची असून त्यांचा सांभाळ करून घ्यावा ही अखेरची विनंती आयुष्यात मुला-मुलींसाठी खूप काही करण्याची इच्छा होती. हरले मी शेवटी…..






