
अलिबाग : सध्या आत्महत्यांचे प्रमाण कमि होण्याचे नाव घेत नसुन वाढतच आहे.अशातच अलीबाग येथे फीरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी दोन लहान मुलांची हत्या करून त्यानि पति – पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अलिबाग येथे मंगळवारी (ता. १७) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. कुणाल गायकवाड (वय २९) आणि प्रियांका इंगळे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या पुरुष व महिलेचे नाव असून त्यांच्याबरोबर माऊली (वय ५) आणि भक्ती (वय ३) मृतावस्थेत आढळली. दरम्यान, मृत चौघेही गेल्या बुधवारी (ता. ११) अलिबागच्या ‘ब्लॉसम कॉटेज’ येथे पर्यटक म्हणून पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथून आले होते.
विशेष म्हणजे २ मे रोजी दोन व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार शिक्रापूर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. गेल्या आठवडाभरापासून पर्यटक म्हणून आलेल्या चौघांपैकी आज दुपारपर्यंत कुणाचाही आवाज येत नसल्याने पुरूष व महिलेचे शव गळफास घेतलेल्या, तर दोन लहान मुलांचे शव खाटांवर पडलेल्या अवस्थेत होते.
पुणे ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासासाठी मदत घेतली जात आहे. शवविच्छेदन आणि पुढील तपासातून घटनेमागील मूळ कारण स्पष्ट होईल.
- अशोक दुधे,पोलिस अधीक्षक, रायगड.





