शेतात जाताना बैलगाडीवरून पडल्याने महिला ठार

Spread the love
संग्रहित छायाचित्र

चाळीसगाव :- शेतात जाताना अचानक तोल जाऊन, बैलगाडीवरून पडल्याने, शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १८ रोजी सकाळी ११ वाजता बोरखेडे बुद्रुक येथे घडली.

तालुक्यातील बोरखेडे बुद्रुक येथे १८ रोजी सकाळी ११ वाजता शेतात ठिबक सिंचनाचे साहित्य बैलगाडीतून नेले जात होते. त्या बैलगाडीवर रत्नाबाई पाटील (वय ५०) बसलेल्या होत्या. अचानक तोल गेल्याने त्या बैलगाडीवरून खाली पडल्या.

रत्नाबाई पाटील

त्यांच्या डोक्याला लोखंडी चाकाचा मार लागला. त्यामुळे रत्नाबाई पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. कष्टकरी शेतकरी कुटुंबातील महिला रत्नाबाई पाटील व त्यांचे पती लक्ष्मण पाटील हे तीव्र उन्हात कापूस लागवडीची तयारी करत होते.

मजुरांचा अभाव असल्याने त्या स्वतः पतीसोबत शेतात ठिबक साहित्य वाहून नेत होत्या. साहित्य घेऊन बैलगाडी शेतात पोहोचली. त्यानंतर बैलगाडीतून ठिबकचे बंडल उतरवत असताना तोल जाऊन, रत्नाबाई पाटील खाली कोसळल्या. चाकाचा लोखंडी भाग डोक्याला लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टीम झुंजार