
अडावद ता.चोपडा झुंजार प्रतिनिधी (डॉ सतीश भदाणे) :
चोपडा :- तालुक्यातील अडावद या गावातील अडावद-कमळगाव रोड लगत असेलेले वैकुंठधाम (स्मशानभूमी) आहे.तिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येते.ग्रामस्थ वारंवार सांगत आहेत कि या ठिकाणी विविध सुविधा जसे कि प्रेत ठेवतो ते कठडे पण नाही,हायमास्ट बसवणे,तार कंपाऊंड,गेट बसवणे ची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
पण याकडे दुर्लक्ष होत आहे.जेणे करून वैकुंठधाम हे रात्री अंधारातून प्रकाशमय होईल.रात्री कधी ही प्रेतयात्रा ही वैकुंठधामला येत असते. यावेळी मोबाईल टॉच, बॅटरी,चा उपयोग करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात.बाजूला डिपी आहे तेथे लाईट लावलेला आहे पण यामागे इतर विकास हा लपलेला आहे
प्रत्यक्षात येथे सुविधांचा अभाव दिसून येत आहे.रात्री जनजनावर ची भिती लक्षात घेता ही समस्या,रखडलेले विकास कामे लवकर व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.





