मालेगाव हादरलं! प्रेमात अडसर ठरणाऱ्या बायकोनं काढला नवऱ्याचा काटा : २ आरोपींना अटक.

Spread the love
संग्रहित छायाचित्र

मालेगाव : – सध्या प्रेमसंबंधातुन हत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे अश्यातच मालेगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभर साथ देण्याचं वचन घेणाऱ्या पत्नीनेच आपल्या पतीला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नापूर्वी प्रियकरासोबत असलेल्या संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढला. 

आयुष्यभर साथ निभावण्याचं वचन घेणाऱ्या पत्नीनंच पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केली. ही खळबळजनक घटना मालेगावच्या टाकळी गावात समोर आली.

या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्येचा छडा लावून पत्नी रोहिणी दीपक सूर्यवंशी आणि तिचा प्रियकर रवींद्र पवारला बेड्या ठोकल्या. दीपक हिरामण सूर्यवंशी असे मयताचे नाव आहे.

दीपकचा रोहिणी सोबत विवाह झाला होता. मात्र रोहिणीचे रविंद्र पवार या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधात रोहिणीचा पती दीपक त्यांना अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी संगनमताने दीपकचा काटा काढायचं ठरवलं. 

ठरल्या प्रमाणे बुधवारी रात्री दीपकचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ तापसचक्रे फिरवत पत्नी रोहिणीची चौकशी केली.

अवघ्या 24 तासात घडलेला प्रकार समोर झाला. पोलिसांनी संशयित आरोपी रविंद्र पवार व पत्नी रोहिणी सूर्यवंशीला ताब्यात घेतलं. पोलिसांचा धाक दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. 

टीम झुंजार