
नवी दिल्ली – सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाचि बातमी आहे. गेल्या काही महिन्यामध्ये सतत वाढणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडर दर वाढीला ब्रेक लावण्यात आला असून आज शनिवार दिनांक 21 मे पासून एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाले आहे.सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारने अचानक मोठा निर्णय घेतल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोल आणि व डिझेल च्या (Petrol and Diesel prices) दरात मोठी कपात करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरवरथेट 200 रुपये, डिझेलवर 7 रुपये आणि पेट्रोल 9.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल असं मानलं जात आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी रात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या (पेट्रोल, डिझेल, गॅस) भाववाढीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता मात्र आता सरकारने या प्रकरणी अचानक मोठा निर्णय घेऊन नागरिकांना मोठी भेट दिली आहे.
काय म्हणाल्या केंद्रीय अर्थमंत्री….
निर्मला सीतारामन म्हणाल्या की,आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रति लिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. याचबरोबर, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर 12 सिलिंडरपर्यंत 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली
तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरचे सध्याचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्याविषयी माहिती घेऊ शकता. घरगुती गॅस सिलिंडरचा दर तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावे लागेल. याठिकाणी कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करते. यासाठी तुम्हाला या लिंकवर क्लिक करावे लागेल.
https://iocl.com/Products/IndaneGas.aspx





