
झुंजार । प्रतिनिधी : संतोष कदम.
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन ते पुण्यतिथी दरम्यान समर्थ नगरी प्रतिष्ठान अक्कलकोटच्या आवाहनास प्रतिसाद देवून मोठया प्रमाणात स्वामींचे नामस्मरण केलेल्या वहया स्वामी भक्तानी पाठविल्या होत्या .
त्याचे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे स्वामी चरणी मोठया भक्ती भावाने अर्पण करण्यात आले. हा सोहळा समर्थ नगरी महिलाअध्यात्मीक समितीच्या माध्यमातून मंदिर समितीचे चेअरमन श्री महेश इंगळे यांच्या उपस्थीत पार पडला .
त्याच प्रमाणे सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचाअध्यक्षपदी सुखदा ग्रामोपादे, सचिव मानसी जाधव, उपाध्यक्ष – अश्विनी शिंपी, खजिनदार – प्रियांका अजगोंडा , सहसचिव – दिपा कोकणे , कार्याध्यक्ष – कावेरी धरणे , जेष्ठ मार्गदर्शक – साहित्यीका आरती काळे , शुभांगी पाठक , याना पुढील कार्यास शुभेच्छा देत श्री स्वामी आशिर्वाद रुपीशाल व प्रसाद देवून श्री महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले .





