‘आगपेटी किंवा लाइटर पेटवू नका’, घरात चिठ्ठीसह आढळले तीन मृतदेह

Spread the love

नवी दिल्ली : – सध्या आत्महत्यांचे प्रमाण वाढतच आहे अश्यातच दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका फ्लॅटमध्ये आई आणि दोन मुली मृतावस्थेत आढळल्या. विषारी वायूच्या गळतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांनी मरण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. घरात येताना आगपेटीची काडी किंवा लाइटर पेटवू नका, असं त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं.

आई मंजू आणि त्यांच्या दोन मुली अंशिका आणि अंकू अशी मृतांची नावे आहेत. मंजू यांच्या पतीचा २०२१ मध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून कुटुंब प्रचंड नैराश्यात होते. मंजू आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेल्या होत्या. शनिवारी सायंकाळच्या सुमारास वसंत अपार्टमेंटमधील २०७ क्रमांकाचे घर आतून बंद असून घरातील लोक दरवाजा उघडत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडला असता गॅस सिलिंडर अर्धवट उघडे असल्याचे दिसले. घराच्या खिडक्या बंद होत्या. तसेच घरात एक चिठ्ठी भिंतीवर चिकटवली होती. पोलिसांनी घरात जाऊन तपासणी केली असता तीन मृतदेह आढळून आले. एक आई आणि दोन मुलींचे हे मृतदेह होते. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवले आहेत.

घरातील सर्व लाईटला प्लास्टीक लावलं होतं. घरातील गॅस सिलिंडर उघडले. यानंतर आई आणि मुलींचा मृत्यू झाला. पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा एक चिठ्ठी सापडली. खूप प्राणघात वायू आहे. दार उघडल्यानंतर आगपेटीची काडी किंवा लाइटर पेटवू नका, असं त्यावर लिहिलं होतं. मृत्यूनंतर पोलिस प्रवेश करताना कोणताही अपघात होऊ नये म्हणून ही चिठ्ठी लिहिली होती. मुलींचे वय 21 ते 25 वर्षे दरम्यान होते.

टीम झुंजार