धक्कादायक ; माय-लेकींचा तीक्ष्ण हत्याराने झोपेत खून, शेजाऱ्याला घेतले ताब्यात.

Spread the love

प्रतिनिधी / धुळे

कौटुंबिक वादाचा संशय; तपासासाठी दोन पथके रवाना.

धुळे : – सध्या घातपाताचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच धुळे जिल्हात धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर महामार्गावर असलेल्या धुळे-सोलापूर तरवाडे गावात सोमवारी पहाटे माय लेकींचा तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याचे उघडकीस आले. महामार्गापासून ३० फुटांवर असलेल्या हॉटेलमध्ये हा खून झाला. दोघींचा आवाज कोणाच्याही कानी आला नाही. मारेकरी पडद्याआड आहे. चंद्रभागा भावराव महाजन (वय ६५), त्यांची मुलगी वंदना गुणवंत महाले (वय ४६) असे त्या माय-लेकींचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एका शेजाऱ्यास ताब्यात घेतले आहे. तरवाडे गावाला लागून महाजन कुटुंबीयांचे चहा अल्पोपाहाराचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये रविवारी रात्री चंद्रभागा

मृत .चंद्रभागा भावराव महाजन आणि वंदना गुणवंत महाले

धुळे तालुक्यातील तरवाडे येथे सोमवारी पहाटे आई चंद्रभागा महाजन व मुलगी वंदना महाले यांचा तीक्ष्ण हत्याराने खून झाला. घटनेनंतर दोन्ही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. हल्ल्यात गंभीर जखमी वंदनाबाई यांनी पहाटे सव्वा सहा वाजता शेवटचा श्वास घेतला. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात पिंजून काढला.

वंदनाबाई यांनी रक्तबंबाळ अवस्थेत शेवटचा हुंदका घेतला. त्यानंतर कुटूंबिय, शेजारी व काही वेळात पोलिस आले. अप्पर उपअधीक्षक प्रदीप मैराळे,पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी पाहणी केली. घटनेची माहिती मिळाल्यावर सकाळी ८ वाजता वंदनाबाई यांची मुलगी दहिवदहून आली. सकाळी नऊ वाजता फॉरेन्सिक डिपार्टमेट तीन जणांचे पथक आले. त्यांनी ब्लॅकेट, गादी, उशी, खाट व जमिनीवर सांडलेल्या रक्ताचे नमुने घेतले. या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मुलीला जमिनीत हिस्सा देण्याचा आईचा आग्रह

महाजन कुटुंबाची सुमारे २० गुंठे जमीन आहे. त्यातील काही वाटा मुलगी वंदनाला द्यावा, असा आई चंद्रभागाबाई यांचा हट्ट होता. त्याला दोन्ही मुले सुरेश, नामदेवचा विरोध होता. त्यातून वाद झाला. शिवाय वंदनाबाई यांना दमदाटी केली. त्यामुळे १९ मे रोजी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. शिवाय संशयित नामदेववर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

७.४५ ला आला जॅक

श्वान पथक जॅक नामक श्वानासह आले. सहाय्यक उपनिरीक्षक आर. जे. जाधव, गोरख मंगळे यांनी जॅकला चंद्रभागाबाई यांच्या चादरीचा गंध दिला.

गावात विखुरले पोलिस

घटनास्थळी पोलिसांसोबतच एलसीबीचे पथकही दाखल झाले. काही कर्मचारी गर्दीमध्ये मिसळले.

100 मीटरवर चाळीसगाव पोलिस हद्द

घटनास्थळापासून १०० मीटरवर चाळीसगाव तालुक्याची हद्द सुरू होते. त्यामुळे चाळीसगाव ख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

४ वर्षांनी दुहेरी हत्याकांड

एकाच कुटूंबातील दोघांचा खून करण्याची ४ वर्षातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ८ जून २०१८ रोजी वैभव- रावसाहेब पाटील या पितापूत्रांचा खून झाला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दोन्ही हत्याकांडात मारेकऱ्याने पीडितांच्या डोक्यांवर वार केला.

हा तर अप्रत्यक्ष हस्तक्षेप

दुहेरी खूनाची माहिती मिळाल्यानंतर गर्दी वाढत गेली. पोलिस येईपर्यंत हॉटेलच्या तिन्ही बाजूंनी गर्दी झाली होती. काही महाभाग थेट मृतदेह व रक्तांच्या थारोळापर्यंत गुटखा खाऊन थुंकले होते. एवढ्या गर्दीमुळे श्वान पथकालाही माग काढणे कठीण झाले होते.

टीम झुंजार