साद फाउंडेशन बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट चा अतिशय थाटात पुरस्कार सोहळा संपन्न.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंद नगर : (ता. इंदापूर )
साद फाउंडेशन या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ” इंदापूर भूषण ” पुरस्कार देऊन सन्मानित केले.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर भुषण पुरस्काराने माजी कॅबिनेट मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

साद फाऊंडेशन या बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट च्या मानाच्या इंदापूर भुषण पुरस्काराचे वितरण.
अतिशय थाटात पुरस्कार सोहळा संपन्न .वालचंदनगर येथील सौ.ललिताबाई मंगल कार्यालयात रासपा चे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर व महाराष्ट्राचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला.यावेळी वालचंदनगर कंपनी चे ॲडमीन मच्छिंद्र शिरसाट, ॲड नीतीन कदम, ॲड दिपक लोखंडे,किरण गोफणे व अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार दिलेले मान्यवर व विभाग
1) राजकीय क्षेत्र- दत्तात्रय भरणे
२) लोकचळवळ/लोक आंदोलन क्षेत्र- ॲड राहुल मखरे
३)सहकार क्षेत्र- अमोल पाटील
४) विधी क्षेत्र- ॲड- शरद जामदार
५) शैक्षणिक क्षेत्र- डॉ.अरूण कांबळे
६) सामाजिक क्षेत्र- सचिन बोगावत
७) वैद्यकीय क्षेत्र- डॉ राजेश कांबळे
८) कृषी क्षेत्र- रोहित भरणे
९)कला क्षेत्र- दादासाहेब जामदार
१०) सर्वोत्कृष्ट सरपंच- सौ.विद्या सावंत
११) पत्रकारिता क्षेत्र- प्रेमकुमार धर्माधिकारी
१२) क्रिडा क्षेत्र- रोहित चव्हाण राष्ट्रीय खेळाडू
१३)बॅंकींग क्षेत्र- जयपाल तोरणे
१४) सांस्कृतिक क्षेत्र- विजय सरतापे
१५) सांस्कृतिक क्षेत्र- राधा खुडे
१६) विशेष प्राविण्य क्षेत्र- अशोक वाघमोडे
१७) पोलीस विभाग- सोमनाथ करडे
१८)वन विभाग- पुजा वाघमारे
विशेष गौरव पुरस्कार
१) शुभम सुर्वे
२) अनिल केंगार
आदर्श युवा साजभुषण पुरस्कार – सुरज गायकवाड
वरील मान्यवरांना इंदापूर भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

हा पुरस्कार सोहळा संपन्न करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे, उपाध्यक्ष नागेश भोसले, कार्याध्यक्ष दत्तात्रय राक्षे, विश्वस्त आप्पा कदम, विश्वस्त क्षितीज वनसाळे, विश्वस्त सोमनाथ भोसले, सौरभ धनवडे, शुभम सुर्वे, अनिल केंगार, सचिव कोमल वनसाळे,सोनु मोरे, रूक्मिणी चव्हाण,सविता राक्षे, मिलिंद भोसले,अजय फलेव इतर कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

सुत्रसंचलन सर्वगोड सर यांनी केले.तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांनी केले. यावेळी महादेवराव जानकर, दत्तात्रय भरणे, राहुल मखरे यांची भाषणे झाली.
सोहळ्याचे नियोजन सुयोग्य पद्धतीने व नेटके. केले होते.

टीम झुंजार