
धुळे : – तालुक्यातील तरवाडे येथील माय-लेकींच्या खुनाचा उलगडा अवघ्या तासात 36 करण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. हितेश गुणवंत महाले (19, रा. आडगाव, ता.एरंडोल, जि.जळगाव) या आरोपीस धुळे स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी अटक केली आहे. आई वंदनाच्या चारीत्र्यामुळे कुटुंबात वाढलेला कलह व आजी चंद्रभागाबाई या वंदना यांना माहेरी येवू देत नसल्याने संतप्त मुलानेच हा खून केल्याची बाब समोर आली आहे.
तालुक्यातील तरवाडे येथील चंद्रभागा महाजन व वंदना महाले या माय-लेकींचा खून वंदना यांचा मुलगा हितेश गुणवंत महाले (वय २२,रा. आडगाव,ता.एरंडोल, जि.जळगाव.) याने केल्याचे उघड झाले. आई वंदनाचे वर्तन अन् आजी चंद्रकला यांच्याकडून केली जाणारी पाठराखणचा त्याच्या डोक्यात त्यामुळे आडगाव राग होता. त्यामुळे आडगाव (ता.एरंडोल) येथून पारोळा मार्गे मध्यरात्री अडीच वाजता येऊन दोन्हीचा खून केला, अशी कबुली अटक करण्यात आलेल्या हितेशने पोलिसांकडे दिली.
धुळे एलसीबीने अवघ्या ३६ तासात खुनाची उकल केली.
सुमारे तीन महिन्यांपासून आई वंदना या माहेरी तरवाडेला राहत होती. तिच्या वर्तनुकीमुळे संपूर्ण कुटूंब त्रस्त होते. पती गुणवंत महाले व दोघां मुलांनी त्यांना पुन्हा आडगाव येथे वास्तव्य करावे, असा आग्रह धरला होता. परंतु वंदना ऐकण्यास तयार नव्हती. तर दुसरीकडे आजी चंद्रभागा यांनी वंदना यांची समजूत काढण्याऐवजी आडगावला जाण्यासाठी संमती देत नव्हती. त्यामुळे दोन्हीच्या बद्दल डोक्यात राग होता. याच रागातून खून केल्याची कबुली त्याने दिली आहे.
पोलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी कारवाई बद्दल पथकाचे कौतुक केले आहे. एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, कर्मचारी संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, रफीक पठाण, योगेश चव्हाण, गौतम सपकाळे, राहूल सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आधीपासून होता संशय
सुरुवातीपासून हितेश याच्यावर संशय होता. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवून होतो. चौकशी केल्यावर त्याच्या बोलण्यात तफावत जाणवली.त्यामुळे संशय बळावला.
-हेमंत पाटील, पोलिस निरीक्षक.
रॉड फेकला रस्त्यात
दोन्हींचा खून केल्यानंतर हितेश पुन्हा आडगावला निघाला. या वेळी खून करण्यासाठी वापरलेला रॉड त्याच्याकडे होता. हा रॉड त्याने रस्त्यात फेकला, अशी माहिती दिली आहे.
असा केला प्रवास
आडगावहून दुचाकीने (क्र.एम.एच. १८, एबी ८४२८) निघालेला हितेश हा पारोळामार्गे शिरूडच्या दिशेने आला. खून करुन याच मार्गाने तो पुन्हा गावात पोहोचला,
मुलानेच केला आई आणि आजीचा खून…
धुळे तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून या दुहेरी हत्याकांडाचा तपास सुरू असताना काही धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासादरम्यान उघडकीस आली आहे. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता मुलानेच आई व आजीचा डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून केला असल्याची माहिती उघडकीस आली.
आईच्या चारित्र्याच्या संशयावरून केला खून…
आईच्या चारित्र्याच्या संशयावरून पोटच्या मुलानेच हे हत्याकांड केले असल्याचे निष्पन्न निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने या खुनी मुलाच्या मुसक्या ३६ तासात आवळल्या असून त्याने या खुनाची कबुली देखील दिली आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून मुलाने आजीच्या घरी पोहोचून लोखंडी रॉड बाहेर झोपलेल्या आई व आजीच्या डोक्यात मारून या दोघेही मायलेकींची निर्घुणपणे हत्या करून त्या ठिकाणाहून पळ काढला होता. चंद्रभागा बाई माळी ६५ व वंदना महाले ४५ हे दोघेही मृत आई व मुलीची नाव आहेत.
कौटुंबिक वादामुळे मुलगी माहेरी…
मुलगी वंदना महालेचे वैवाहिक वाद सुरू असल्यामुळे ती आईकडेच राहत होती. तरवाडे गावातच हॉटेल व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत होती. पहाटे दोघी मायलेकींचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर या हत्येसंदर्भात तर्कवितर्क लावले जात होते.





